जिल्ह्यात प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:24 IST2021-02-05T06:24:10+5:302021-02-05T06:24:10+5:30
शहरातील श्री गुरुजी आयटीआय येथे अरुण समुद्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संजय अयाचित, शांताराम देशमुख, प्राचार्य वि. ...

जिल्ह्यात प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा
शहरातील श्री गुरुजी आयटीआय येथे अरुण समुद्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संजय अयाचित, शांताराम देशमुख, प्राचार्य वि. के. गाडेकर, प्रसाद कुलकर्णी, पी.व्ही.देशमुख, अतुल ठोंबरे, महेश औरादे, रविकांत मार्कंडेय, सुनील बोकील, विजय सहदेव, सुधाकर जोशी यांची उपस्थिती होती. साई रोड येथील आनंदभवन बालविकास केंद्रात प्रजासत्ताकदिनी माजी केंद्रप्रमुख शिवाजी दंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शिवदास शिंदे, इंद्रजित माने, पांडुरंग सिंदाळकर, शिवकुमार चाकोते, आश्विनी जोशी, पल्लवी चाकोते, श्रवण शिंदे उपस्थित होते.
भारत प्राथमिक विद्यालयामध्ये विष्णू भुतडा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब सूर्यवंशी, डॉ. व्यंकटराव सिद्धेश्वरे, भागवत, जगन्नाथ येरोळकर, मल्लिकार्जुन रोडगे आदींसह शिक्षक उपस्थित होते.
लातूर तालुक्यातील कव्हा येथील स्वामी दयानंद विद्यालयात प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी माजी सरपंच ललिताबाई तानाजीराव पाटील कव्हेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शालेय स्थानिक समितीचे अध्यक्ष अशोक पाटील, किशोर घार, नेताजी मस्के, शिवशरण थंबा, गोविंद सोदले, सदाशिव सारगे, नामदेव मोमले, नागेश जाधव, रसूल पठाण, गोपाळ सारगे, सूर्यकांत होळकर, नवनाथ साखरे, आकाश जाधव, मुख्याध्यापिका अरुणा कांदे, प्रकाश देशमुख, अमर पाटील, शिक्षक कदम, मानकरी, थंबा, अक्कलदिवे, मोकाशे, धामणगावे, राम कौरे, राजाराम काळे आदींसह शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.
शहरातील महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेच्या गुळमार्केट येथील मुख्य कार्यालयात बँकेचे अध्यक्ष माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष एस.आर. मोरे, अॅड. गंगाधर हामने, कार्यकारी संचालक अमरदीप जाधव, एम.डी. बाळासाहेब मोहिते, माधव अंकुलगे, योगेश पाटील आदी उपस्थित होते.
शहरातील डाॅ. झाकीर हुसेन विद्यालयात प्रजासत्ताकदिन साजरा करण्यात आला. यावेळी निजामोद्दीन सिद्दीकी, सत्तार शेख, ए.के. कादरी, फसियोद्दीन सिद्दीकी, रियाज अहमद सिद्दीकी, नुसरत कादरी, अमजत खान, आर.डी. जोशी, सुभाष लंगर, जिलानी शेख, हलीमा बागवान, सिराज पटेल, हनीफ शेख, सुबहान शेख, अंबादास सुसंगे आदींची उपस्थिती होती.