शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

गोगलगाय प्रादुर्भावाच्या नुकसान भरपाईसाठी रेणापूर कडकडीत बंद

By हरी मोकाशे | Updated: September 24, 2022 19:00 IST

पिंपळफाटा येथे शेतकऱ्यांचा अर्धा तास ठिय्या

रेणापूर (जि. लातूर) : गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे तालुक्यातील सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले. नुकसानीची भरपाई देण्यात यावी, या मागणीसाठी शनिवारी शेतकऱ्यांच्यावतीने रेणापुरात बंदचे आवाहन करण्यात आले. त्यास व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली व्यापारी प्रतिष्ठाने कडकडीत बंद ठेवली. दरम्यान, शेतकऱ्यांनी पिंपळफाटा येथे अर्धा तास ठिय्या आंदोलन केले.

रेणापूर तालुक्यात खरिपातील सोयाबीचे पीक चांगले उगवले होते. त्यामुळे चांगले उत्पादन होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे उगवलेल्या पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना दुबार- तिबार पेरणी करावी लागली. परंतु, सतत गोगलगायींचा प्रादुर्भाव होत राहिला. त्यातच अतिवृष्टी झाल्याने संपूर्ण पिकास फटका बसला.

दरम्यान, प्रशासनाने गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे तालुक्यातील ३ हजार ३१५ शेतकऱ्यांच्या शेतातील २५०० हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाल्याचे दाखविले आहे. ही शेतकरी संख्या आणि क्षेत्र संपूर्णपणे चुकीचे आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन पंचनामे केले नाहीत. त्यामुळे आम्ही वारंवार ताेंडी तक्रारी, लेखी निवेदने दिली. परंतु, वास्तविक पंचनामे करण्यात आले नाहीत.शासनाने तालुक्यातील केवळ ३ हजार ३१५ शेतकऱ्यांच्या नावाची यादी जाहीर केली आहे. ती आम्हा शेतकऱ्यांस मान्य नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान द्यायचे असल्यास सरकारने सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.

गोगलगाय अनुदानात तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. तो दूर करावा. येत्या १५ दिवसांत शेतकऱ्यांना सरसकट अनुदान देण्यात यावे, अशी मागणी करीत हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाची दखल न घेतल्यास यापुढे आणखीन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

या आंदोलनात संजय इगे, बालाजी कदम, बाळासाहेब कातळे, सचिन मोटेगावाकर, राजन हाके, अजय औसेकर, रफिक सय्यद, शरद दरेकर, प्रकाश जाधव, रमाकांत वाघमारे, दशरथ मेकले, बळीराम मुंगे, समाधान गाडे, श्रीपाल बस्तापुरे, विश्वनाथ गायकवाड, ॲड. देविदास कातळे, जी.एम. उटगे, राम पाटील, अतुल कातळे, सोनू उरगुंडे ,धनराज भांबरे, सतीश माने, दिलीप अकनगिरे, सचिन इगे, गणेश कलशेट्टी आदी शेतकरी सहभागी झाले होते.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरी