पैसे देण्याच्या कारणावरून मारहाण
लातूर : पैसे देण्याच्या कारणावरून शिवीगाळ करून दगडाने डोक्यात मारून जखमी केल्याची घटना अहमदपूर तालुक्यातील आनंदवाडी येथे घडली. याबाबत रविकांत बाबुराव केंद्रे (रा. आनंदवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बळीराम भगवान फड (रा. शेणी, ता. अहमदपूर) यांच्याविरुद्ध अहमदपूर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकाॅ. केंद्रे करीत आहेत.
मागील भांडणाच्या कारणावरून मारहाण
लातूर : मागील भांडणाच्या कारणावरून आनंद नगर येथे मारहाण झाल्याची घटना घडली. याबाबत किरण गजानन उधारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनिल गजानन उधारे व अन्य दोघांविरुद्ध विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोना. सलवार करीत आहेत.
सामाईक बांधावरून मारहाण; गुन्हा दाखल
लातूर : सामाईक बांध फोडण्याच्या कारणावरून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना नणंद शिवारात घडली. याबाबत वैभव बळवंत मोरे (रा. नणंद, ता. निलंगा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तानाजी यशवंत नांगरे व अन्य दोघांविरुद्ध किल्लारी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ. शिंदे करीत आहेत.
बेल्टने मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा
लातूर : फिर्यादीस विनाकारण बारा नंबर पाटी येथे बेल्टने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली. याबाबत सचिन विश्वंभर चव्हाण (रा. इंदिरा नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेखर खंडापुरे व अन्य दोघे (सर्व रा. हरंगुळ) यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. बिराजदार करीत आहेत.