येरोळ येथील प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमण हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:22 AM2021-03-01T04:22:48+5:302021-03-01T04:22:48+5:30

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ येथे राष्ट्रीयकृत बँक आणि जिल्हा मध्यवर्ती बॅक असून, दरोरोज दहा ते बारा गावांचे नागरिक ...

Removed encroachment on major road at Yerol | येरोळ येथील प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमण हटविले

येरोळ येथील प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमण हटविले

googlenewsNext

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ येथे राष्ट्रीयकृत बँक आणि जिल्हा मध्यवर्ती बॅक असून, दरोरोज दहा ते बारा गावांचे नागरिक कामकाजानिमित्त ये-जा करतात. मात्र, काही नागरिकांनी रस्त्यालगतच्या गटारीवर बांधकाम केले हाेते. परिणामी, या अतिक्रमाणामुळे रस्त्यावरून नागरिकांसह वाहनांना वावरणे कठीण झाले हाेते. दाेन वाहने एकमेकांसमाेर आली, तर अडचण हाेत हाेती. नवीन निवडून आलेले ग्रामपंचायत सरपंच सुकमार लोकरे, उपसरपंच सतीश सिंदाळकर आणि ग्रामपंचायत सदस्यांनी बैठकीत अतिक्रमण हटविण्याचा निर्णय घेतला. या प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमण जेसीबीच्या साह्याने हटविण्यात येत आहे. नागरिकांनी आपले सांडपाणी रस्त्यावर सोडू नये, असे आवाहन उपसरपंच सतीश सिंदाळकर यांनी केले आहे. त्याचबराेबर, गटारीची स्वच्छता करणार असल्याचे सांगितले. अतिक्रमण हटविल्याने रस्त्याने मात्र मोकळा श्वास घेतला आहे. जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षक भितींजवळ करण्यात आलेले अतिक्रमणही हटविण्यात यावे, अशी मागणी पालकांसह नागरिकांतून हाेत आहे.

Web Title: Removed encroachment on major road at Yerol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.