जिल्ह्याला दिलासा, ४५ नवीन बाधित रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:24 IST2021-06-09T04:24:42+5:302021-06-09T04:24:42+5:30

लातूर : काेराेनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून कमी हाेत असून, साेमवारी जिल्ह्याला दिलासा मिळाला असून, ४५ नवीन बाधित रुग्ण ...

Relief to the district, 45 new infected patients | जिल्ह्याला दिलासा, ४५ नवीन बाधित रुग्ण

जिल्ह्याला दिलासा, ४५ नवीन बाधित रुग्ण

लातूर : काेराेनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून कमी हाेत असून, साेमवारी जिल्ह्याला दिलासा मिळाला असून, ४५ नवीन बाधित रुग्ण आढळले आहेत तर १७१ रुग्णांनी काेराेनावर मात केली आहे. सध्याचा बाधितांचा आलेख ८९ हजार ५६७वर पाेहोचला आहे. यातील ८६ हजार २२७ रुग्ण बरे हाेऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत ६४५ रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत २ हजार २८२ रुग्णांचा काेराेनाने बळी घेतला आहे. साेमवारी ५१७ जणांची आरटीपीसीआर चाचणी केली असता, २३ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे तर ९१८ रॅपिड ॲंन्टिजन चाचणी केली असता, यातील २२ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. साेमवारी एकूण ४५ काेराेनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली आहे. उपचार सुरु असताना जिल्ह्यात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ६ रुग्णांचा समावेश आहे. काेराेनासह सहव्याधी असलेल्या दोघांचा समावेश आहे तर ६० वर्षांखालील ६ रुग्णांचा समावेश आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. एल. एस. देशमुख यांनी सांगितले. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १ हजार ५८ आहे. जिल्ह्याचा पाॅझिटिव्हिटी रेट १५.९ टक्क्यांवर आला आहे तर रिकव्हरी रेट ९६.२७ टक्क्यांवर आहे. दिवसेंदिवस काेराेनाबाधितांचा आकडा खाली घसरत असून, हे चित्र लातूर जिल्ह्यासाठी दिलासादायक आहे.

Web Title: Relief to the district, 45 new infected patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.