सायंकाळी ५ वाजता सुरू होते नाेंदणी; ५ मिनिटात हाऊसफुल्ल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:19 AM2021-05-12T04:19:43+5:302021-05-12T04:19:43+5:30

लातूर : जिल्ह्यात १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुरु झाले असून, सायंकाळी ५ वाजता ऑनलाईन नोंदणी ...

Registration starts at 5 pm; Housefull in 5 minutes! | सायंकाळी ५ वाजता सुरू होते नाेंदणी; ५ मिनिटात हाऊसफुल्ल !

सायंकाळी ५ वाजता सुरू होते नाेंदणी; ५ मिनिटात हाऊसफुल्ल !

googlenewsNext

लातूर : जिल्ह्यात १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुरु झाले असून, सायंकाळी ५ वाजता ऑनलाईन नोंदणी सुरु होताच अवघ्या पाच ते दहा मिनिटात नियोजित डोससाठी नोंदणी हाऊसफुल्ल होऊन जाते. त्यात प्रत्येक केंद्रावर १८ ते ४४ वयोगटासाठी केवळ २०० जणांनाच लस दिली जात असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून दुसऱ्या लाटेतही कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहिमेला गती देण्यात आली आहे. आतापर्यंत २ लाख ७ हजार जणांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस दिली जात आहे. लाभार्थ्यांची संख्या वाढत असल्याने आणि लसीकरणाची व्यापक प्रमाणात जनजागृती झालेली असल्याने प्रत्येक जण लस घेण्यासाठी धडपड करीत आहे. कोरोनावर लस प्रभावी असल्याने लसीकरणासाठी वाट पाहण्याची वेळ आली आहे. १८ ते ४४ वयोगटासाठी ऑनलाईन नोंदणी बंधनकारक असून, सायंकाळी पाच वाजता नोंदणी सुरु होते. मात्र, ५ ते १० मिनिटात नोंदणी हाऊसफुल्ल होत आहे. अनेकजण दुपारी ४ वाजेपासून बुकिंगसाठी मोबाईल, संगणकासमोर बसत असल्याचे चित्र आहे. शहरात केवळ चार केंद्र असून, लसीकरणासाठी ग्रामीण भागातील केंद्रही निवडले जात आहेत. प्रत्येक केंद्रावर १८ ते ४४ साठी केवळ २०० डोस दिले जात आहेत. परिणामी, आतापर्यंत ७ हजाराहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे.

सायंकाळी ५ वाजता रहा तयार...

आरोग्य सेतू ॲप किंवा कोव्हीन ॲपवर जाऊन ऑनलाइन नाव नोंदणी करावी. त्यासाठी रजिस्ट्रेशन, साईन इन युवरसेल्फमध्ये मोबाईल क्रमांक, ओटीपी प्राप्त होताच आधार कार्डवरील नाव व जन्मतारीख नमूद करावी. सायंकाळी पाच वाजता जिल्ह्यासाठी बुकिंग सुरु होते. त्यामुळे शेड्यूल्ड अपॉईंटमेंटवर क्लिक केल्यानंतर पिनकोड, जवळचे लसीकरण केंद्राची यादी येते. स्लॉट मिळाला तर तारीख व वेळ कोणती यांची नोंद करावी. अपॉईंटमेंट मिळाल्यानंतर नोंदणीकृत मोबाईलवर संदेश प्राप्त होतो.

१८ ते ४४ वयोगटातील झालेले लसीकरण - ७२००

१८ ते ४४ वयोगटातील एकूण लोकसंख्या - ९.५० लाख

१८ ते ४४ वयोगटासाठी जिल्ह्यातील एकूण केंद्र - १५

एक आठवड्यापासून प्रयत्न करतोय...

कोरोना लसीकरण हा प्रभावी उपाय असून, १ मेपासून १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण सुरु झाले आहे. गेल्या आठ दिवसांपासून अपॉईंटमेंट घेण्यासाठी प्रयत्न करतोय. मात्र, यश मिळत नाहीये. शासनाने प्रत्येक केंद्रावर २०० जणांनाच लस देण्याचे धोरण ठरविले आहे. त्यामुळे गैरसोय होत आहे. - नागरिक

१ मेपासून लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर मागील पाच दिवसांपासून नोंदणीसाठी प्रयत्न करीत आहे. परंतु काही वेळेतच संकेतस्थळ बंद होत आहे. नाेंदणी करण्यास अडचण येत असल्याने पुरेशा प्रमाणात लसीचा साठा उपलब्ध होणे आवश्यक आहे. - नागरिक

लसीकरणासाठी नाेंदणी झाली आहे. मात्र, अपॉईंटमेंट मिळत नसल्याचे चित्र आहे. लस केव्हा मिळणार हा प्रश्न आहे. दररोज सायंकाळी पाच वाजता बुकिंग करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, एका केंद्रावर २०० जणांचीच नोंदणी होत असल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रत्येकाला लस मिळेल यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. - नागरिक

Web Title: Registration starts at 5 pm; Housefull in 5 minutes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.