शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

देशभरात बीएच मालिकेची नोंदणी झाली क्लिष्ट 

By आशपाक पठाण | Updated: February 24, 2024 18:54 IST

परिवन विभागाच्या सूचना : एका व्यक्तीच्या नावाने एकाच वाहनाची होणार नोंदणी.

लातूर : बीएच मालिकेत वाहनाला नंबर मिळविण्यासाठी आता नवीन क्लिष्ट प्रक्रियेला वाहनधारकांना सामोर जावे लागणार आहे. शिवाय, एका व्यक्तीला एकच वाहनाची नोंद करता येणार आहे. यासाठी काढण्यात आलेल्या २६ ऑगस्ट २०२१ च्या अध्यादेशात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे आता कंपनीचे चार राज्यातील कार्यालय, बदलीची शक्यता, वाहन घेण्याची ऐपत आदी गोष्टी पाहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

खाजगी संस्थेतील तथा शासकीय सेवेतील वाहनधारक जे दावा करतात की त्यांच्या शासकीय / खाजगी कंपनीचे कार्यालय विविध राज्यात आहे, अशा वाहनधारकांकडून मागील विविध राज्यातील वास्तव्याचा दाखला, वेतन देयके, ज्या कंपनीत अर्जदार कामाला होता, तो आता आहे की नाही याची खातरजमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चार राज्यात शाखा व इतर राज्यात बदली होऊ शकते, यापूर्वी इतर राज्यात काम केले का याबाबतची तपासणी केल्यावर बीएच सीरीजमध्ये नोंदणी करावी, केवळ इतर राज्यात बदली होऊ शकते असे नमूद करीत अर्ज आल्यावर त्याची नोंदणी करू नये, असेही आदेशात म्हटले आहे.

वाहनाची रक्कम अदा केल्याचा पुरावा...

बीएच क्रमांसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीने स्वत:च्या बँक खात्यातून वाहन खरेदीसाठी रक्कम अदा केली किंवा कर्ज प्रकरण असल्यास वितरकास दिलेल्या रकमेचा पुरावा तपासणे. त्यात विसंगती आढळून आल्यास अर्ज नाकारण्यात यावा. २५ लाख किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीची चार चाकी, २ लाखांपेक्षा जास्तीची दुचाकी बीएच क्रमांकासाठी आली तर वाहनधारकाचे आयटी रिटर्न, खात्याचे विवरण तपासावे, संबंधित वाहनधारकाची खरोखरच ते वाहन खरेदी करण्याची ऐपत आहे की याची तपासणी करावी, अशा सूचना प्रादेशिक परिवहन विभागाला करण्यात आल्या आहेत.

सुरक्षा दलातील जवानांचे केवळ ओळपत्र...बीएच नोंदणीसाठी भारतीय सुरक्षा दलातील जवानांचे केवळ ओळखपत्र घेऊन नोंदणी करावी, त्यांना इतर कागदपत्रांची मागणी करू नये. या सिरीजमध्ये नोंदणी केलेल्या वाहनधारकांनी दर दोन वर्षांनी कर भरला आहे की याची तपासणी करावी. पुढील कालावधीचा कर न भरल्यास मागणीपत्र पाठवावे, कर भरणा न केल्यास मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्याची सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी सांगितले.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीlaturलातूर