शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

लातूर जिल्हा परिषदेत सहाय्यक पदांसाठी भरती प्रक्रिया वेगात, दोन दिवसांत मिळणार नियुक्तीपत्र

By हरी मोकाशे | Updated: August 7, 2024 18:30 IST

इच्छुकांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू,निवड झालेल्यांना सहा महिने विद्यावेतन

लातूर : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत सहाय्यक पदांच्या भरती प्रक्रियेस वेग आला आहे. नोंदणी केलेल्या इच्छुकांच्या कागदपत्रांची बुधवारी जिल्हा परिषदेत पडताळणी सुरु होती. दिवसभरात १०३ जणांच्या शैक्षणिक प्रमाणपत्रांची छाननी करण्यात आली आहे. यात पात्र ठरलेल्यांना दोन दिवसांत नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे. त्यामुळे नोंदणी केलेल्या सुशिक्षित युवकांच्या चेहऱ्यावर आनंद व्यक्त होत आहे.

दरवर्षी मोठ्या प्रमाणात युवक शिक्षण घेऊन नोकरी, व्यवसायाच्या शोधात फिरत आहेत. बहुतांश जणांना अनुभवाअभावी व्यवसाय, नोकरी मिळविण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे सुशिक्षत युवकांना नोकरीक्षम बनविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु करण्यात आली आहे. आयटीआय, पदवी, पदविका व पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्यांना सहा महिने सहाय्यक म्हणून नियुक्त करीत प्रशिक्षण व रोजगार देण्यात येत आहे.

७८६ ग्रामपंचायतींत सहाय्यक पदांची भरती...जिल्ह्यात एकूण ७८६ ग्रामपंचायती आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीत एक सहाय्यक नियुक्त करण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरु आहे. शुक्रवारी नोंदणीकृत इच्छुकांना बोलावून शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे.

२५६ इच्छुकांच्या प्रमाणपत्रांची पाहणी...जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात बुधवारी वित्त विभागातील ४७, पशुसंवर्धन- ७, आरोग्य- २ आणि शिक्षण विभागातील ४६ पदांसाठी भरतीसाठी इच्छुकांच्या प्रमाणपत्रांची छाननी करण्यात आली. गुरुवारी सामान्य प्रशासन विभागातील २५६ जणांच्या शैक्षणिक प्रमाणपत्रांची तपासणी होणार आहे.

इच्छुकांनी ऑनलाईन नोंदणी करावी...मुख्यमंत्री युवा कार्य योजनेअंतर्गत प्रशिक्षण आणि रोजगारासाठी इच्छुक सुशिक्षितांनी ऑनलाईन नोंदणी करावी. कागदपत्रांच्या पडताळणीनंतर निवड प्रक्रिया पार पडणार आहे. बुधवारी १०३ जणांच्या कागदपत्रांची छाननी करण्यात आली.- दत्तात्रय गिरी, डेप्युटी सीईओ, सामान्य प्रशासन.

२ हजार पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु...योजनेअंतर्गत २ हजार ३६ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. आतापर्यंत २ हजार ९८० जणांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. त्यापैकी २७ जणांना नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत. इच्छुकांनी www.rojgar.mahaswayam.gov.in संकेत स्थळावर नोंदणी करावी.- बालाजी मरे, सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास.

टॅग्स :laturलातूरLatur z pलातूर जिल्हा परिषद