वीज बिल न देताच महावितरणची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:18 IST2021-03-19T04:18:35+5:302021-03-19T04:18:35+5:30

जिल्ह्यात महावितरणचे १५ उपविभाग आहेत. यामध्ये १ लाख २६ हजार ५३ कृषिपंपधारक आहेत. त्यापैकी १ लाख २५ हजार ९४६ ...

Recovery of MSEDCL without paying electricity bill | वीज बिल न देताच महावितरणची वसुली

वीज बिल न देताच महावितरणची वसुली

जिल्ह्यात महावितरणचे १५ उपविभाग आहेत. यामध्ये १ लाख २६ हजार ५३ कृषिपंपधारक आहेत. त्यापैकी १ लाख २५ हजार ९४६ ग्राहकांकडे १ हजार २७८ कोटींची थकबाकी आहे. वीज बिल वसुलीसाठी नियमित बिल देणे आवश्यक असताना वर्षानुवर्षे बिल न देता सध्या महावितरणची वीज बिल वसुली मोहीम सुरू आहे. बिल न भरल्यास वीज पुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे शेतकरी वर्गामधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया....

गेल्या अनेक वर्षांपासून वीज बिल मिळालेले नाही. आता न सांगताच वीज कनेक्शन कट केले आहे. त्यामुळे पिकांना पाणी कसे देणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. वीज बिल भरण्यास सवलत देण्याची गरज आहे. - शेतकरी

महावितरणच्यावतीने वीज बिल भरण्यासाठी तगादा लावला जात आहे. वेळेवर बिल दिले जात नाही. एकदाच बिलाची मोठी रक्कम आली असल्याने बिल भरण्यास अडचण येत आहे. - शेतकरी

आतापर्यंत एकदाही महावितरणच्यावतीने रीडिंग घेतलेले नाही; पण बिल अवाच्या सव्वा दिले आहे. खरीप आणि रब्बी हंगामात अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे बिलासाठी पैसे कुठून आणणार. शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यास मुदत द्यावी. - शेतकरी

थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी मोहीम राबविली जात आहे. महावितरणच्यावतीने सवलत दिली जात आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेऊन थकीत वीज बिलाचा भरणा करून महावितरणला सहकार्य करावे. महावितरण लातूर विभाग

जिल्ह्यातील कृषीपंपधारक शेतकरी - १,२६,०५३

वीज बिल थकबाकी रक्कम - १२७८ कोटी

उपविभागनिहाय कृषिपंपचालक

लातूर ग्रामीण - ११५९९

लातूर उत्तर - ३५२

लातूर दक्षिण - ३६९

मुरुड ग्रामीण - १३३७२

रेणापूर - ११२६९

औसा - १७८११

किल्लारी - ७०६७

निलंगा - १८७३०

शिरूर अ. ४९६७

अहमदपूर - ७८४८

चाकूर - १०६६४

देवणी - ५०७५

शिरूर ताजबंद - ८७८६

उदगीर ग्रामीण - ७४४३

उदगीर शहर -७२१

Web Title: Recovery of MSEDCL without paying electricity bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.