पानगावात विनामास्क फिरणाऱ्यांकडून दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:18 AM2021-04-12T04:18:13+5:302021-04-12T04:18:13+5:30

विकेंड लॉकडाऊनअंतर्गत शनिवारी येथील बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान, ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी गोपीनाथ टकले, तलाठी कमलाकर तिडके, ...

Recovery of fines from unmasked travelers in Pangaon | पानगावात विनामास्क फिरणाऱ्यांकडून दंड वसूल

पानगावात विनामास्क फिरणाऱ्यांकडून दंड वसूल

Next

विकेंड लॉकडाऊनअंतर्गत शनिवारी येथील बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान, ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी गोपीनाथ टकले, तलाठी कमलाकर तिडके, पोलीस उपनिरीक्षक नागसेन सावळे यांच्या पुढाकारातून शनिवारी सकाळी महसूल, पोलीस, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पथक गावात फिरत होते. तेव्हा आठ जण विनामास्क असल्याचे आढळून आले. त्यांच्याकडून प्रत्येकी २०० रुपयांप्रमाणे १६०० रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी गोपीनाथ टकले यांनी दिली.

यावेळी पोलीस उपनिरीक्षक नागसेन सावळे, तलाठी कमलाकर तिडके, ग्रामविकास अधिकारी गोपीनाथ टकले, पोलीस प्रशासनाचे सुरेश उस्तुर्गे, अनंत कांबळे, नामदेव चेवले, शंकर हंगरगे, राजू पंडगे, ज्ञानोबा गायकवाड, धनराज मुठ्ठे, सुधाकर डाके, शंकर गिराम, सुलेमान शेख यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी परमेश्वर गालफाडे, अनिल हणवते, विजयकुमार इंगळे आदी उपस्थित होते.

Web Title: Recovery of fines from unmasked travelers in Pangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.