जगत् जागृती विद्यामंदिरात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:24 IST2021-08-14T04:24:19+5:302021-08-14T04:24:19+5:30
अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सर्वोत्तमराव कुलकर्णी होते. यावेळी संस्थेचे सचिव नरेश पाटील चाकूरकर, सहसचिव बाबुराव बिडवे, संस्था सदस्य ॲड.विक्रम पाटील ...

जगत् जागृती विद्यामंदिरात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सर्वोत्तमराव कुलकर्णी होते. यावेळी संस्थेचे सचिव नरेश पाटील चाकूरकर, सहसचिव बाबुराव बिडवे, संस्था सदस्य ॲड.विक्रम पाटील चाकूरकर, विठ्ठलराव सोनटक्के, करण पाटील चाकूरकर, मन्मथ शेटे, मुख्याध्यापक प्रल्हाद तिवारी, महादेव काळोजी, पर्यवेक्षक संजय नारागुडे आदी उपस्थित होते. विद्यालयात प्रथम आलेल्या सृष्टी तोंडारे हिला इंदिरा पाटील चाकूरकर यांच्या स्मरणार्थ सन्मानचिन्ह व रोख रक्कम देण्यात आली. द्वितीय आलेल्या शेख शाफिया आत्तेखूर रहेमान आणि अथर्व पाटील यांना संस्थेच्या वतीने रोख रक्कम व शिवप्रसाद शेटे यांच्या वतीने सन्मानचिन्ह देण्यात आले. तृतीय आलेल्या नंदिनी प्रताप कोरे हिचा विकास हाळे यांच्या वतीने रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला.
मेघराज ब्याकुडे, अलोक पाटील, स्नेहा शिवराज वाघमारे, सोहम केंद्रे, आशिष सोमवंशी, फिरदोस मुजम्मिल शेख, रोहन रोडगे, किरण कांबळे, संपदा तुकाराम सूर्यवंशी, अंजली जनार्धन कांबळे, रुद्र पाटील, मोहिनी संगमेश्वर सूर्यवंशी, वृषाली दिलीप वाघमारे, नंदिनी बालाजी व्होट्टे, शबनम रहिमखान पठाण, ओमकार भोसले, वेदांत तेलंगे, पूर्वा परमेश्वर डिगोळे, राजू चव्हाण, अर्पिता अशोक हिप्पाळे, सुमित सोनकांबळे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी पालक प्रतिनिधी म्हणून सुवर्णा ढोबळे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन राजीव पिटलावार यांनी केले. आभार बिपीन जिरगे यांनी मानले.