महावितरणच्या वतीने एसएमएसद्वारे रीडिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:19 IST2021-05-12T04:19:50+5:302021-05-12T04:19:50+5:30
शहरातील बाजारात भाजीपाल्यांची आवक लातूर : जिल्हा प्रशासनाच्या वतीने संचारबंदीत दोन दिवसांसाठी शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळी ...

महावितरणच्या वतीने एसएमएसद्वारे रीडिंग
शहरातील बाजारात भाजीपाल्यांची आवक
लातूर : जिल्हा प्रशासनाच्या वतीने संचारबंदीत दोन दिवसांसाठी शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळी शहरातील भाजीपाला बाजारात मोठ्या प्रमाणात आवक झाली. शेपू, कोबी, मिरची, लसूण, वांगी, टोमॅटो, बटाटे, कांदे, गवार, मेथी, पालक आदी भाज्यांची आवक झाली. दरही स्थिर होते. दरम्यान, संचारबंदी दोन दिवसांसाठी शिथिल करण्यात आली असल्याने बाजारात गर्दी होती. मात्र, विक्रेत्यांनी नियमांचे पालन करीत भाजीपाला विक्री केला.
उघड्या डीपीमुळे अपघाताचा धोका
लातूर : शहरातील औसा रोडवरील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रवेशद्वाराजवळ उघडा विद्युत डीपी आहे. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे अपघाताचा धोका होण्याची शक्यता आहे. दरम्यान, स्थानिक नागरिकांच्या वतीने विद्युत डीपीला संरक्षक झाकण बसविण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, त्याकडे महावितरणचे दुर्लक्ष आहे. सदरील बाबीकडे तत्काळ लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
परशुराम पार्क परिसरात अस्वच्छता
लातूर : शहरानजीक असलेल्या परशुराम पार्क परिसरात रस्त्याच्या कडेला कचरा टाकला जात आहे. त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. हा कचरा उचलण्यासाठी नियमित घंटागाडी येत नसल्याची नागरिकांची ओरड आहे. याकडे संबंधित प्रशासनाने तत्काळ लक्ष देऊन नियमित कचरा उचलावा, अशी मागणी होत आहे. दरम्यान, रस्त्याच्या कडेला पडलेला कचरा वाऱ्यामुळे रस्त्यावर येत असून, वाहनधारकांची गैरसोय होत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.