लसीकरणाला पुन्हा खीळ; १३१ केंद्र बंद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:25 IST2021-04-30T04:25:00+5:302021-04-30T04:25:00+5:30

मनपाने लस खरेदी करावी; आयुक्तांकडे मागणी लातूर शहरात व परिसरात मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत. कोरोना प्रतिबंधाला लस महत्त्वाची ...

Re-vaccination; 131 centers closed! | लसीकरणाला पुन्हा खीळ; १३१ केंद्र बंद !

लसीकरणाला पुन्हा खीळ; १३१ केंद्र बंद !

मनपाने लस खरेदी करावी; आयुक्तांकडे मागणी

लातूर शहरात व परिसरात मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत. कोरोना प्रतिबंधाला लस महत्त्वाची ठरत आहे. या बाबीचा विचार करून महानगरपालिकेने स्वत: लस खरेदी करून नागरिकांना मोफत द्यावी, अशी मागणी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे. केंद्र शासनाकडून पुरवठा कमी झाला आहे, त्यामुळे अडचणी येत आहेत. राज्य शासनाने लस खरेदी करून मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. तो स्वागतार्ह आहे. मनपानेही लस खरेदी करून शहरातील नागरिकांना ती मोफत द्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.

लस खरेदीसाठी आर्थिक तरतूद करावी

लातूर शहरातील लोकसंख्या चार ते साडेचार लाख आहे. आतापर्यंत ५३ हजारांच्या आसपास लसीकरण झाले आहे. किमान २ लाख लोकांना पुरेल इतकी लस मनपाने खरेदी करावी. त्यासंबंधीची आर्थिक तरतूद करावी. नियोजन समितीकडून त्यासाठी काही निधी मिळतो का, याबाबत आपण मागणी पालकमंत्र्यांकडेही करणार असल्याचे चंद्रकांत बिराजदार यांनी म्हटले आहे.

Web Title: Re-vaccination; 131 centers closed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.