राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांची जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:25 IST2021-02-27T04:25:53+5:302021-02-27T04:25:53+5:30
राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या जयंतीनिमित्त पंचायत समितीच्या माजी सभापती अयोध्याताई केंद्रे यांच्या हस्ते १०५ नारळ व आंब्याच्या ...

राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांची जयंती साजरी
राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या जयंतीनिमित्त पंचायत समितीच्या माजी सभापती अयोध्याताई केंद्रे यांच्या हस्ते १०५ नारळ व आंब्याच्या रोपांची लागवड करण्यात आली. तसेच संगोपनाची जबाबदारी केंद्रे यांनी स्वतः जबाबदारी घेतली. समाजातील गरीब, गरजू २१ मुला- मुलींना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. त्याचबराेबर आर्थिक मदत देण्यात आली. २१ निराधार महिलांना साडी-चोळीचे वाटप करण्यात आले. २१ निराधार कुटुंबांना महिनाभर पुरेल एवढे धान्य वाटप करण्यात आले.
माजी सभापती अयोध्याताई केंद्रे यांनी सामाजिक बांधीलकी जोपासत विविध उपक्रम राबविले आहेत. तालुक्यात लेक वाचवा अभियान, गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, सामूहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून शंभरांपेक्षा अधिक जोडप्यांना गृहोपयोगी साहित्य दिले आहे. तसेच राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या जीवनावरील पुस्तकाचे प्रकाशनही माजी सभापती अयोध्याताई केंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी १०५ पदार्थांची पूजा मांडण्यात आली होती.