राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा जयंती उत्सव साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:26 IST2021-02-26T04:26:20+5:302021-02-26T04:26:20+5:30

गुरुवारी सकाळी ८ वा. राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या संजीवन समाधीस रुद्राभिषेक करण्यात आला. त्यानंतर ५० भाविकांच्या उपस्थितीत ...

Rashtrasant Dr. Celebrating the birth anniversary of Shivling Shivacharya Maharaj | राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा जयंती उत्सव साजरा

राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा जयंती उत्सव साजरा

गुरुवारी सकाळी ८ वा. राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या संजीवन समाधीस रुद्राभिषेक करण्यात आला. त्यानंतर ५० भाविकांच्या उपस्थितीत कीर्तनकेसरी भगवंतराव पाटील चांभारगेकर यांचे कीर्तन झाले. दुपारी १२ वा. बेल भस्म उधळण करून जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी संगण बसप्पा मठाचे बसवेश्वर महाराज आचार्य, शिवाचार्य महाराजांचे उत्तराधिकारी राजशेखर शिवलिंग शिवाचार्य उपस्थित होते.

यावेळी आचार्य गुरुदास स्वामी म्हणाले, राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे आचार-विचार हे परमरहस्य चालते-बोलते व्यासपीठ होते. त्यांचे विचार, आचार आणि संस्कार आपल्या मनावर रुजविले तर मानवी जीवनाचे कल्याण होईल. सुख आणि समाधान याचा भक्तिमार्ग त्यांनी भक्तांना सांगितला. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब जाधव, माजी आमदार विनायकराव पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष शिवानंद हिंगणे, काँग्रेसचे सरचिटणीस सांब महाजन, कीर्तनकार प्रवचनकार मंडळाचे अध्यक्ष शिवराज नावंदे गुरुजी, बालाजी महाराज येरोळकर, विकास महाराज भुरे, उद्धव महाराज हैबतपुरे, मन्मथप्पा पालापुरे, शिवलिंग पाटील, कैलास महाराज डोंगरगावकर, सोमनाथ स्वामी चांदेगावकर, विश्वनाथ स्वामी वडवळकर, राजेश्वर स्वामी लाळीकर, बाबुराव सोनटक्के करंजीकर, गोरोबा काका शिवणे, श्रीराम देशमुख नांदेडकर, लक्ष्मण महाराज, दिलीप स्वामी, मारुती महाराज भालके, दयानंद महाराज देवडीकर, संगमेश्वर महाराज वलांडी, महेश गिरी महाराज चाकूर, अशोक गुंडफळे, रोडगे महाराज देवर्जन, रजनीताई मंगलगे, शीला शेटकर गंगाखेड, डॉ. शुभांगी खुबा, वर्षा देशमुख, कमलबाई स्वामी, सुप्रिया घोटे, लक्ष्मण पटणे आदी उपस्थित होते.

Web Title: Rashtrasant Dr. Celebrating the birth anniversary of Shivling Shivacharya Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.