लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार (प्रादेशिक)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:24 IST2021-02-05T06:24:36+5:302021-02-05T06:24:36+5:30
पोलिसांनी सांगितले, तालुक्यातील चोबळी येथील रोहित रणधीर पाटील याचे एका २० वर्षीय मुलीसोबत दीड वर्षापासून प्रेमसंबंध होते. त्याने लग्नाचे ...

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार (प्रादेशिक)
पोलिसांनी सांगितले, तालुक्यातील चोबळी येथील रोहित रणधीर पाटील याचे एका २० वर्षीय मुलीसोबत दीड वर्षापासून प्रेमसंबंध होते. त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिला १९ ऑगस्ट २०२० रोजी मध्यरात्री दुचाकीवरून रांजणगाव पुणे येथे नेले. तिथे एका ओळखीच्या घरी तीन महिने ठेवून शारीरिक संबंध ठेवले. पीडितेने लग्नाचा तगादा लावल्यानंतर त्याने तिला आळंदी येथे नेले. तिथे तीन महिने राहिले. दरम्यान, ती गरोदर राहिल्याने जबरदस्तीने तिला गोळ्या खाऊ घातल्या. तसेच मोबाईलमध्ये अश्लील फोटो काढून अन्य कुणासोबतही तुझे लग्न होऊ देणार नाही, अशी धमकी दिली.
२२ जानेवारी रोजी आरोपीच्या भावाने आळंदी येथे येऊन दोघांना गावाकडे आणले. त्यानंतर आरोपीच्या काकाने घरी जा असे म्हणत दोघांना वेगळे केले, अशी फिर्याद पीडित तरुणीने दिली आहे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध कलम ३७६, ३१३, ५०६ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.