रंगकर्मी पुरस्कार जाहीर; उदगीरात होणार वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:18 IST2021-02-15T04:18:12+5:302021-02-15T04:18:12+5:30
साहित्य, कला, सामाजिक, कृषी व शैक्षणिक पुरस्कार देऊन दरवर्षी सन्मानित केेेले जाते. या वर्षीचे पुरस्कार रंगकर्मीचे अध्यक्ष प्रा. बिभीषण ...

रंगकर्मी पुरस्कार जाहीर; उदगीरात होणार वितरण
साहित्य, कला, सामाजिक, कृषी व शैक्षणिक पुरस्कार देऊन दरवर्षी सन्मानित केेेले जाते. या वर्षीचे पुरस्कार रंगकर्मीचे अध्यक्ष प्रा. बिभीषण मद्देेेवाड यांनी शनिवारी जाहीर केले. सदरील पुरस्कार २० फेब्रुवारी रोजी वितरित करण्यात येणार आहेत. लासलगाव येथील सचिन होळकर, निलंगा येथील एन. आर. स्वामी, प्रकाश घादगीने, जळकोटचे विलास सिंदगीकर, अंबादास केदार, लातूर येथील संगीता फुलचंद कासार, सांगलीचे राजाराम तायाप्पा माने, गडचिरोली येथील अशोक बोरकुटे, उस्मानाबाद भावना चौधरी, उदगीर येथील अनिता यलमटे, नीता मोरे, रामेश्वर पटवारी, राचम्मा मळभागे, नांदेडच्या संध्या प्रमोद कुलकर्णी, दीपाली संजय कुलकर्णी, औरंगाबाद सलीम अहमद आत्तार, पनवेल सिद्धप्पा लक्ष्मण शिंदे, पुणे येथील अर्चना पाटील, डॉ. प्रशांत नवटक्के, मुंबई पोलीस दलातील श्रीकांत शिवाजी देशपांडे यांचा धाडसी कार्याबद्दल विशेष सन्मान केला जाणार आहे, असे प्रा. बिभीषण मद्देेेवाड, मारोती भोसले, ॲड. विष्णू लांडगे यांनी सांगतिले.