शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
3
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
4
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
5
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
6
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
7
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
8
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
9
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
10
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
11
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
12
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
13
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
14
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
15
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
16
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
17
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
18
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
19
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
20
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले

राष्ट्रवादीकडून रमेश कराड यांना उमेवारीसाठी विचारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 5:24 AM

विधान परिषदेच्या लातूर-उस्मानाबाद-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढविणार असून, भाजपाचे रमेश कराड यांना पक्षप्रवेश देऊन निवडणुकीत उतरविण्याची तयारी सुरू असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

लातूर : विधान परिषदेच्या लातूर-उस्मानाबाद-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढविणार असून, भाजपाचे रमेश कराड यांना पक्षप्रवेश देऊन निवडणुकीत उतरविण्याची तयारी सुरू असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.काँग्रेसचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख हे निवडणूक लढविण्यास इच्छुक नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने या जागेवर दावा केला आहे. जिल्हानिहाय पक्षीय बलाबल लक्षात घेता भाजपाचे २८८, राष्ट्रवादी काँग्रेस २७९, काँग्रेस १८०, शिवसेना ६१ तर इतर ९४ मतदार आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाल्यास निकाल आघाडीच्या बाजूने राहील, असा अंदाज बांधून राष्ट्रवादी हा मतदारसंघ लढविण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रवादीकडून उस्मानाबाद येथील उद्योजक अशोक जगदाळे आणि बीड येथून अमरसिंह पंडित यांची नावे चर्चेत आहेत. तर काँग्रेस पक्षामधून दिलीपराव देशमुख यांनीच निवडणूक लढवावी, असा आग्रह आहे. परंतु, पक्षाने नव्यांना संधी द्यावी, अशी भूमिका घेत दिलीपराव यांनी निवडणुकीपासून दूर राहणे तूर्त तरी पसंत केले आहे.भाजपामध्ये उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच असून, माजी मंत्री सुरेश धस, रमेश कराड तसेच मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांची नावे चर्चेत आहेत.