शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

"अजितदादांच्या अपघाताची 'CBI' चौकशी व्हावी!"; रामदास आठवलेंनी मांडली स्पष्ट भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 18:06 IST

माझा राज्यसभेचा कार्यकाळ संपत आला असला तरी, पुन्हा निवडीसाठी माझे नाव अधिकृत असेल, यात मला कोणतीही अडचण वाटत नाही

लातूर : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा विमान अपघात ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. अजितदादा हे एक महान आणि धाडसी नेतृत्व होते. त्यांच्या जाण्याने राज्याचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणाची सत्यता लोकांसमोर येण्यासाठी 'सीबीआय' चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी येथे केली.

लातूर दौऱ्यावर असताना आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आठवले यांनी विविध सामाजिक आणि राजकीय विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली. लातूरच्या नवोदय विद्यालयातील मुलीच्या मृत्यूबाबत बोलताना आठवले म्हणाले, त्या मुलीने आत्महत्या केली असली तरी, या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. पीडित कुटुंबाला समाजकल्याण विभागाच्या वतीने ४ लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. तसेच, कुटुंबातील एका सदस्याला नोकरी मिळवून देण्यासाठी आणि मुख्यमंत्री निधीतून अतिरिक्त मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.

राजकीय घडामोडी आणि राज्यसभा...!स्वतःच्या उमेदवारीबद्दल बोलताना आठवले यांनी विश्वास व्यक्त केला. माझा राज्यसभेचा कार्यकाळ संपत आला असला तरी, पुन्हा निवडीसाठी माझे नाव अधिकृत असेल, यात मला कोणतीही अडचण वाटत नाही, असे त्यांनी नमूद केले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल बोलताना त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. शरद पवार आमचे जुने मित्र आहेत, ते पुन्हा राज्यसभेवर आले तर आम्हाला आनंदच होईल. शरद पवार जर एनडीएमध्ये आले असते, तर ते कदाचित देशाचे राष्ट्रपती झाले असते. पण त्यांनी तो निर्णय योग्य वेळी घेतला नाही.

घातपाताच्या शंकेवर स्पष्टीकरण..!अजित पवार यांच्या अपघाताबाबत राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेवर त्यांनी स्पष्ट मत मांडले. मला यात कोणताही घातपात वाटत नाही. घातपाताची शंका उपस्थित करणे म्हणजे अजितदादांच्या प्रतिमेला धक्का लावण्यासारखे आहे. मात्र, शंका दूर करण्यासाठी संपूर्ण चौकशी होणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Ramdas Athawale demands CBI inquiry into Ajit Pawar's accident.

Web Summary : Ramdas Athawale calls for CBI probe into Ajit Pawar's unfortunate plane accident. He dismissed foul play but stressed thorough investigation. He also addressed other political and social issues, including Rajya Sabha prospects and support for a grieving family.
टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेAjit Pawarअजित पवारlaturलातूर