शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

लातूर एमआयडीसीत थाटला गुटखा कारखाना; २७९ गोण्यातील अडीज कोटींचा गुटखा जप्त

By राजकुमार जोंधळे | Updated: May 29, 2024 19:19 IST

लातुरात पोलिसांची कारवाई; सात जणांवर गुन्हा दाखल, तीन कोटींचा मुद्देमाल जप्त

लातूर : शहरातील अतिरिक्त एमआयडीसी परिसरात थाटण्यात आलेल्या गुटख्याच्या कारखान्यावर चाकूर येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांनी बुधवारी सकाळी धाड टाकली. या धाडीत २७९ गोण्यातील २ कोटी ३० लाख ६२ हजार रुपयांचा गुटख्यासह  तब्बल ३ कोटी ५ लाख ७३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात एकूण सात जणांविरोधत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी सांगितले, लातुरतील अतिरिक्त एमआयडीसी परिसरात धनंजय कोंबडे यांच्या कोंबडे ऍग्रो वेअर हाऊस, सी / २७ वेअर हाऊस येथे गुटखा तयार करण्यात येत असून, याच परिसरात गुटख्याचा करखनाच सुरु करण्यात आल्याची माहिती खबऱ्याने जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांना दिली. याबाबतच्या माहितीची पडताळणी केल्यानंतर चाकूर येथील सहाय्यक पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांना कारवाईचे आदेश दिले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पोउपनि. होनाजी चिरमडे, पोउपनि. राजेश घाडगे, पोहेकॉ. विष्णू गुंडरे, पोना. अनंतवाड, पोकॉ. कांबळे, धडे, गाडेकर, शिंदे, पेद्देवाड, रायबोळे यांना सोबत घेऊन बुधवारी धाड टाकली. यावेळी तब्बल ३ कोटी ५ लाख ७३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अंकुश रामकिशन कदम (३२,र. रायवाडी ता. चाकूर), हसनाकुमार तिलाई उराम (२१ रा. बिहार), गोकुळ धनाराम मेघवाल (रा. राजस्थान), धनंजय गहिनीनाथ कोंबडे, पारस बालचंद पोकर्णा, राम केंद्रे आणि विजय केंद्रे (चौघेही रा. लातूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

उद्योगाच्या नावाखाली गुटख्याची निर्मिती, विक्री..?लातुरातील एमआयडीसी परिसरात उद्योगाच्या नावाखाली छुप्या पध्दतीने गुटखा तयार करुन, तो ट्रक आणि इतर वाहनातून विक्री केला जात असल्याचा प्रकार पोलिसांच्या धाडीत समोर आला आहे. पोलिसांनी कोट्यवधींची उलाढाल करणारा गोरखधंदाच उधळून लावला आहे. 

लातूर शहर पोलिसांना नाही कुठलीही खबर..लातूर शहरात मोठ्या प्रमाणावर वाहनातून कोट्यवधींचा गुटखा पुरवला जात आसल्याचे आता समोर आले आहे. हा अवैध व्यवसाय स्थानिक पोलिसांच्या नजरेला कसा काय पडला नाही? याबाबत नागरिकांत कमालीचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

खबऱ्याने पोलिसांना दिली टीप;गुटख्याचा कारखान्याचे फुटले बिंग..आठवडाभरापूर्वीच खबऱ्याला एमआयडीसीतील गुटख्याच्या कारखान्याची माहिती मिळाली. ही माहिती, टीप पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांना मिळाली, त्यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले. यातून कोटयवधीची उलाढाल असलेल्या गुटख्याच्या कारखान्याचे बिंग फुटले आहे.

टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारी