शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

चाकूर, हाळी-हंडरगुळी येथील गुटख्यावर धाड, दहा लाखांचा मुद्देमाल जप्त; रात्री उशिरापर्यंत सुरू होती करवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2022 00:57 IST

चाकूर येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत कदम, प्रशिक्षणार्थी पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकांनी ही कारवाई केली. दरम्यान, पोलिसांनी दहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

लातूर- चाकूरसह हंडरगुळी येथील विविध ठिकाणी पोलीस पथकाने शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत छापेमारी केली. यात ५ लाख ८० हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री उशीरापर्यंत गुटखा विक्री करणाऱ्याविरोधात कारवाई सुरु होती. चाकूर येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत कदम, प्रशिक्षणार्थी पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकांनी ही कारवाई केली. दरम्यान, पोलिसांनी दहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

पोलिसांनी सांगितले, चाकूर शहरात गुटख्याची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांच्या घरावर पोलिसांनी छापा मारला. यात हाती लागलेला गुटखा उदगीर तालुक्यातील हंडरगुळी येथून पुरवठा केला जात असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलीस पथकाने हंडरगुळी येथेही छापा मारला. एकूण सात ठिकाणावर मारलेल्या छाप्यात ५ लाख ८० हजार ७५ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.  या कारवाईत, प्रल्हाद माने यांच्याकडून २ हजार ९०० रुपयांचा गुटखा, हाळी हंडरगुळी येथील ओमकार मलीकार्जुन कालवणे यांच्याकडून गुटखा, पानमसाला असा ३०३५० रुपयांचा मुद्देमाल, रोशन वजीरसाव तांबोळी (रा. हाळी) याच्याकडून ३७५०२५ रुपयांचा गुटखा, पान मसाला जप्त केला आहे. सुनील माचेवाड (रा. हंडरगुळी ता. उदगीर) याच्याकडून ३४८०० रुपयांचा गुटखा, पानमसाला, विष्णू हमदळे (रा. हंडरगुळी) याच्याकडून ७५६०० रूपयांचा गुटखा, पानमसाला, रामदास चिंतलवार (रा. हंडरगुळी) यांच्याकडून ६५४०० रुपयांचा गुटखा, पानमसाला असा मुद्देमाल जप्त केला आहे. शिवाय, गुटख्याची वाहतूक करणारी कार पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे चाकूर येथील सहाय्यक पाेलीस अधीक्षक अनिकेत कदम यांनी सांगितले.

टॅग्स :laturलातूरraidधाडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी