शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी यांचा लातुरात अचानक मुक्काम; सोलापूरच्या सभेहून परतण्यास उशीर, रात्री विमान उड्डाणाची सुविधा नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 21:28 IST

नियोजित दौऱ्यानुसार दुपारी ३ वाजता लातूर विमानतळावर पोहोचण्याची वेळ निर्धारित होती. परंतु, त्यांचे विमान दुपारी ४.३० वाजता पोहोचले. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने सोलापूरकडे सभेसाठी रवाना झाले. सोलापूरलाही विमानतळाचे काम सुरू असल्याने त्यांचा दौरा लातूरमार्गे ठरला होता.

लातूर : सोलापूर येथील बुधवारची सभा आटोपून काँग्रेस नेते राहुल गांधी हेलिकॉप्टरने लातूरच्या विमानतळावर सायंकाळी ६.५० वाजता पोहोचले. परंतु, येथील विमानतळावरून रात्रीच्या वेळी विमान उड्डाणाची सुविधा नसल्याने त्यांचा लातुरात अचानक मुक्काम झाला. नियोजित दौऱ्यानुसार दुपारी ३ वाजता लातूर विमानतळावर पोहोचण्याची वेळ निर्धारित होती. परंतु, त्यांचे विमान दुपारी ४.३० वाजता पोहोचले. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने सोलापूरकडे सभेसाठी रवाना झाले. सोलापूरलाही विमानतळाचे काम सुरू असल्याने त्यांचा दौरा लातूरमार्गे ठरला होता.

वैमानिक म्हणाले जोखीम नको...नियोजित वेळेपेक्षा उशिराने त्यांचा परतीचा प्रवास सोलापूरमधून हेलिकॉप्टरने सुरू झाला. सायंकाळी उशिरा ते लातूरला पोहोचले. ठरल्याप्रमाणे ते विमानाने दिल्लीला जाणार हे निश्चित असताना वैमानिकाने अंधार पडल्यामुळे जोखीम नको, असे स्पष्ट सांगितले. परिणामी, लातुरात अचानक मुक्काम घडला.

हॉटेलवर भोजन, विश्रांती...मुक्काम ठरल्यानंतर राहुल गांधी कारने विमानतळावरून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील हॉटेलमध्ये मुक्कामाला आले. त्यांच्यासमवेत माजी मंत्री आ. अमित देशमुख होते. हॉटेलमध्ये आल्यानंतर त्यांनी भोजन घेऊन विश्रांती केली. दरम्यान, ते गुरुवारी सकाळी लवकर दिल्लीकडे रवाना होतील, असे सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसlaturलातूर