रयत शेतकरी संघटनेचा संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:20 IST2021-05-21T04:20:46+5:302021-05-21T04:20:46+5:30
रयत शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदारांना बुधवारी निवेदन देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष अर्जुन कुंडगीर, सचिव विठ्ठल डोईफोडे, रामेश्वर सलगरे, वैजनाथ ...

रयत शेतकरी संघटनेचा संताप
रयत शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदारांना बुधवारी निवेदन देण्यात आले.
यावेळी तालुकाध्यक्ष अर्जुन कुंडगीर, सचिव विठ्ठल डोईफोडे, रामेश्वर सलगरे, वैजनाथ केसगिरे, तुळशीराम बेंबडे, खुशाल कुंडगीर, रवि आवले, आकाश नरले आदींची उपस्थिती होती. कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन असल्याने शेतकऱ्यांच्या शेतीमालास भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत. दरम्यान, रासायनिक खतांच्या भाववाढीमुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
खरीप हंगामासाठी लागणारे बी-बियाणे व खतांच्या खरेदीसाठी शेतकरी कर्ज घेतात. कोरोनामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत असल्याने पीक कर्जासाठी खासगी बँका, सोसायट्यांकडे पीककर्जासाठी धडपड करीत आहेत. अशा परिस्थितीत खताच्या दरात वाढ झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. तत्काळ भाव वाढ रद्द करावी, अशा मागणीचे निवेदन रयत शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदार रामेश्वर गोरे यांना देण्यात आले.