शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारचे नाव गुन्ह्यात का नाही? अजित पवार यांच्या मुलाला पोलिस वाचवत आहेत का? मुंढवा जमीन घोटाळाप्रकरणी उच्च न्यायालयाचा सवाल
2
लाडक्या बहिणींना ‘योग्यवेळी’ २१०० रुपये; विरोधकांकडून अदिती तटकरे यांची कोंडी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी किल्ला लढविला
3
इंडिगोवर नजर ठेवणार डीजीसीएची टीम; सीईओ पीटर एल्बर्सना हजर राहण्याचे आदेश
4
महाराष्ट्र ‘गप’गार; पारा १० अंशांपर्यंत घसरला; कडाक्याची थंडी पडली
5
जमिनीच्या ‘सनद’ची अट रद्द; महसूलमंत्री बावनकुळे यांनी विधानसभेत मांडले विधेयक
6
गोव्याच्या धर्तीवर वाहतूक पोलिसांकडे ‘बॉडी कॅमेरा’; मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट : प्रमुख शहरांत टप्प्याटप्प्याने
7
सदस्य आहेत तर मंत्री नाहीत अन् मंत्री आहेत तर लेखी उत्तरच मिळत नाही!
8
खडसेंना काेर्टाचा दणका, भाेसरी भूखंड घाेटाळाप्रकरणी आरोपमुक्तीचा अर्ज फेटाळला
9
भाजप, शिंदेसेनेत प्रवेश केलेल्यांची धाकधूक वाढली; दोन किंवा जास्त तिकीटे हवे असलेले हवालदिल
10
ई-वाहनांना येत्या ८ दिवसांत टोलमाफी, भरलेला मिळणार; राहुल नार्वेकर यांनी दिले आदेश
11
वर्षभरात आठ हजार नवीन एसटी बसेस रस्त्यावर येणार; २०२९ पर्यंत बस डेपोंचा कायापालट करणार
12
दीपावली उत्सव युनेस्कोच्या वारसा यादीत; भारतासाठी अभिमानाची घटना; पंतप्रधान मोदींनी केले निर्णयाचे स्वागत
13
मुंबईत आतापर्यंत सापडले ४१,०५७ दुबार मतदार, दुबार नावांमध्ये होणार; १५ ते २० टक्केपर्यंत घट !
14
काय झालास तू? 'व्होट बँके'साठी महाभियोग प्रस्ताव आणल्याचा आरोप, ठाकरेंना अमित शाहांनी घेरले
15
नेहरू, इंदिरा गांधी अन् सोनिया गांधी...! अमित शाह यांनी थेट लोकसभेत दिली मत चोरीची 3 उदाहरणं, स्पष्टच बोलले
16
"त्यांच्यावर बोलायला मी रिकामा नाही"; राहुल गांधींच्या आरोपांची मुख्यमंत्री फडणवीसांनी उडवली खिल्ली
17
सीतामढी जिल्ह्यात 'HIV ब्लास्ट', आतापर्यंत 7400 HIV ग्रस्त आढळले? डॉक्टर म्हणाले, बाधितांनी निगेटिव्हसोबत लग्न करू नये
18
इस्रायली पंतप्रधानांचा PM मोदींना फोन, या संदर्भात व्यक्त केला आनंद; गाझावरही चर्चा
19
भरधाव ब्रेझा उभ्या असलेल्या वॅगनआरला धडकली, दोन्ही कारने घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू
20
संस्थेची गाडी, हातात अर्ज अन् चर्चांना उधाण; तानाजी सावंतांच्या मुलाने भरला भाजपचा उमेदवारी अर्ज?
Daily Top 2Weekly Top 5

लातूर महापालिकेत 'बोगस' लिपिक नियुक्तीचे रॅकेट; आयुक्तांच्या बनावट सही-शिक्क्याने 'ऑर्डर'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 16:00 IST

या गंभीर प्रकारानंतर लातूर मनपा प्रशासनाने तत्काळ पावले उचलली; शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

लातूर : लातूर महानगरपालिकेत लिपिक पदाच्या सहा नियुक्त्या बोगस पद्धतीने दिल्याचा खळबळजनक प्रकार माहिती अधिकार कायद्यांतर्गत उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या सहा उमेदवारांना ही नोकरीची ऑर्डर मिळाली, त्यांनीच सत्यता पडताळण्यासाठी आरटीआयमध्ये अर्ज केल्यानंतर हा मोठा घोटाळा प्रशासनाच्या निदर्शनास आला.

शुभम बाळासाहेब गरड, ज्ञानेश्वरी रवी गरड, मारुती भगवान शिवणे, आदित्य बंकट भिंगे, सोमनाथ लक्ष्मण पांचाळ आणि बापूराव कोंडिराम हुडे या सहा व्यक्तींना लातूर महापालिकेत लिपिकपदाची ऑर्डर मिळाली होती. संशय आल्याने याच लोकांनी महापालिकेकडे माहितीच्या अधिकारात अर्ज करून त्यांना मिळालेली 'नोकरीची ऑर्डर' आणि 'वैद्यकीय प्रमाणपत्र' खरे आहे की खोटे, याची खात्री मागवली.

आरटीआयच्या उत्तरात महापालिकेने स्पष्ट केले की, अनुक्रमांक एक ते चारमधील माहिती मनपाकडे उपलब्ध नाही. त्याचा अर्थ या नियुक्त्या मनपाच्या नोंदीनुसार झालेल्या नाहीत. दरम्यान, सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तापडे व आस्थापना विभागप्रमुख अभिमन्यू पाटील यांच्या चौकशीत, ही ऑर्डर मनपा आयुक्त मानसी मीना यांच्या बोगस सही आणि शिक्क्याचा वापर करून दिली गेल्याचे निष्पन्न झाले.

पोलीस तक्रार दाखल, चौकशी सुरूया गंभीर प्रकारानंतर लातूर मनपा प्रशासनाने तत्काळ पावले उचलली आहेत. महापालिकेचे सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तापडे आणि आस्थापना विभागप्रमुख अभिमन्यू पाटील यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शिवाय, आयुक्त मानसी मीना यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी तापडे आणि पाटील यांची नियुक्ती केली आहे.

बोगस ऑडरमागे कोणाचा हात..!बोगस ऑर्डर देण्यामागे कोणत्या व्यक्तींचा किंवा रॅकेटचा हात आहे, याचा तपास शिवाजीनगर पोलिस करत आहेत. या घटनेमुळे महापालिकेच्या प्रशासनात खळबळ उडाली आहे. सोमवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. पोलीसांनी हे प्रकरण तपासवार ठेवले आहे.

नियुक्ती आदेश गेले नाहीतआयुक्त श्रीमती मानसी यांच्या बोगस सही-शिक्याचा आधारे लिपिक पदाच्या सहा जणांना बोगस ऑर्डर दिल्याचे आरटीआयमुळे समोर आले आहे. त्यांना ऑर्डर कोणी दिल्या, हे संबंधितांनाच माहीत असेल. याबाबत मनपा प्रशासनाने पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिस तपासातून सत्य समोर येईल. आम्ही चौकशी केली आहे. आमच्या कार्यालयातून हे नियुक्ती आदेश गेले नाहीत.- अभिमन्यू पाटील, आस्थापना विभागप्रमुख, लातूर मनपा

English
हिंदी सारांश
Web Title : Fake Clerk Recruitment Racket Busted in Latur Municipal Corporation.

Web Summary : Latur Municipal Corporation uncovered a bogus clerk recruitment scheme. Six candidates received fake appointment letters with forged signatures. An RTI query exposed the scam, prompting a police investigation into the racket.
टॅग्स :laturलातूरMunicipal Corporationनगर पालिकाfraudधोकेबाजी