बँकेसमोर ग्राहकांच्या रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:19 IST2021-03-18T04:19:08+5:302021-03-18T04:19:08+5:30
राष्ट्रीयीकृत बँकेला शनिवार व रविवारी सुट्टी होती. सोमवार व मंगळवारी संपामुळे सलग चार दिवस बँका बंद राहिल्या. बुधवारी बँकेसमोर ...

बँकेसमोर ग्राहकांच्या रांगा
राष्ट्रीयीकृत बँकेला शनिवार व रविवारी सुट्टी होती. सोमवार व मंगळवारी संपामुळे सलग चार दिवस बँका बंद राहिल्या. बुधवारी बँकेसमोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी बहुतांश नागरिकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन नियमांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. बँकेतील आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी फिजिकल डिस्टन्स ठेवण्यात येत नसल्याचे पाहावयास मिळाले. प्रत्येकाला लवकर बँकेत प्रवेश करून कामकाज उरकण्याची घाई होती. त्यामुळे बँकेसमोर रांगा लागल्या होत्या. दरम्यान, बँकेसमोर जमलेल्या ग्राहकांना विविध कामासाठी तातडीने रक्कम काढायची होती. एटीएममध्ये अनेकांची रक्कम काढण्यासाठी एकच झुंबड उडाली होती. त्यामुळे एटीएममध्ये फिजिकल डिस्टन्स राखला जात नव्हता.
नियम पाळण्याचे आवाहन...
याबाबत बँकेचे शाखा व्यवस्थापक श्रीराम उन्हाळे म्हणाले, बँकेत व्यवहारासाठी येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाने शासन नियमांचे पालन करावे, असे सातत्याने आवाहन करण्यात येत आहे.