गुणवत्तापुर्ण संशोधन ही आधूनिक काळाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:15 IST2021-05-03T04:15:14+5:302021-05-03T04:15:14+5:30
दयानंद विज्ञान महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र व जैवतंत्रज्ञान विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय ऑनलाईन कार्यशाळेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य ...

गुणवत्तापुर्ण संशोधन ही आधूनिक काळाची गरज
दयानंद विज्ञान महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र व जैवतंत्रज्ञान विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय ऑनलाईन कार्यशाळेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड यांची तर उपप्राचार्य डॉ. सिद्धेश्वर बेल्लाळे, . डॉ. राहुल मोरे, डॉ. कोमल गोमारे, डॉ. रोहिणी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. मिश्रा म्हणाले, भारतात मूलभूत संशोधनावर भर देऊन, योग्य निष्कर्ष काढून जागतिक स्तरावरील भारताची संशोधन क्षेत्रातील नावलौकिकता कशी वाढेल यासाठी मिसाईल मॅन, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्यासारख्या प्रेरणादायी वैज्ञानिकांचा आदर्श घेऊन संशोधकांनी आपले आयुष्य उज्ज्वल बनविले पाहिजे. संशोधनाच्या क्षेत्रातील भारताचाही दर्जा उंचावला पाहिजे, असेही ते म्हणाले. प्रास्ताविक कार्यशाळा समन्वयक डॉ. कोमल गोमारे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. श्वेता मदने यांनी तर आभार डॉ. राहुल मोरे यांनी मानले. याप्रसंगी प्रा.मेघा पंडित, डॉ.महेश कराळे, प्रा.करूणा कोमटवार आदींसह प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.