विनामास्क फिरणा-यांवर दंडात्मक कार्यवाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:21 IST2021-04-28T04:21:23+5:302021-04-28T04:21:23+5:30
देवणी तालुक्यातील वलांडी परिसरात काहीजण विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. ते रोखण्यासाठी येथील उदगीर- निलंगा राज्यमार्गावरील मुख्य चौकात पोलीस बंदोबस्त ...

विनामास्क फिरणा-यांवर दंडात्मक कार्यवाही
देवणी तालुक्यातील वलांडी परिसरात काहीजण विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. ते रोखण्यासाठी येथील उदगीर- निलंगा राज्यमार्गावरील मुख्य चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच पोलीस, महसूल, पंचायत समिती, कृषी विभागाच्या कर्मचा-यांचे संयुक्त पथक आहे. वलांडी येथील चौकात विनाकारण फिरणाऱ्या तसेच मास्क न वापरणाऱ्या दुचाकीचालक चारचाकी चालकांवर दंडात्मक कार्यवाही करुन अकराशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
ही कार्यवाही पोलीस निरीक्षक पंकज शिनगारे, वलांडी पोलीस चौकीचे फौजदार डफलवाड, विस्तार अधिकारी अमोल गायकवाड, कृषी सहाय्यक धनेगावे, ग्रामपंचायतीचे गंगाधर विभुते, पोलीस नाईक राजपाल साळुंके यांनी केली. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. मास्कचा नियमित वापर करावा. प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे. वलांडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ४५ वर्षांपुढील नागरिकांना सोमवार, बुधवार, शुक्रवारी कोविड लस देण्यात येत असून नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन वलांडीच्या सरपंच राणीताई भंडारी यांनी केले आहे.