जिल्ह्यातील तीन लाख शालेय विद्यार्थ्यांना कडधान्य, डाळ, तांदळाचे झाले वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:23 IST2021-02-05T06:23:50+5:302021-02-05T06:23:50+5:30
लातूर : शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार मिळावा, यासाठी शालेय पोषण आहार उपक्रम राबविला जातो. कोरोनाच्या संकटामुळे शाळा बंद होत्या. ...

जिल्ह्यातील तीन लाख शालेय विद्यार्थ्यांना कडधान्य, डाळ, तांदळाचे झाले वितरण
लातूर : शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार मिळावा, यासाठी शालेय पोषण आहार उपक्रम राबविला जातो. कोरोनाच्या संकटामुळे शाळा बंद होत्या. शाळांमध्ये असलेला पोषण आहार खराब होऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात आला. जिल्ह्यातील जवळपास ३ लाख ६ हजार १०४ विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळाला आहे.
पोषण आहाराअंतर्गत विद्यार्थ्यांना तांदूळ, कडधान्य व डाळींचे वाटप करण्यात आले आहे. आता शाळा सुरू झाल्या असून, पोषण आहार अद्याप दिला जात नाही. कोरोना काळात उरलेला पोषण आहार पालकांना, विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून वाटप करण्यात आला. जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांना कडधान्य, डाळ आणि तांदळाचे वितरण करण्यात आले असल्याचे पोषण आहार विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
कोरोना नियमांचे पालन...
n पोषण आहार वाटप करताना मास्क, फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझर, आदी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. शाळास्तरावर दररोज वर्गनिहाय पालकांना बोलाविले जात होते. त्यानुसार शिल्लक असलेला पोषण आहार वाटप झाला आहे.
n कोरोना नियमांचे पालन करीत शाळा सुरू झाल्या असून, पाचवी ते दहावीचे वर्ग सुरू झाले आहेत. शिक्षण विभागाकडून निर्देश प्राप्त होताच पोषण आहार दिला जाणार आहे. जिल्ह्यात जवळपास २ हजार ६९७ शाळा आहेत. यामध्ये प्राथमिक व माध्यमिक शाळांचा समावेश आहे. आता नियमित वर्ग सुरू झाल्याने विद्यार्थ्यांची उपस्थितीही वाढत आहे.
शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्वच शाळांमध्ये पोषण आहार दिला जातो. नियमितपणे तांदूळ, कडधान्य, डाळींचे वितरण केले जाते. कोरोनामुळे शाळा बंद होत्या. परिणामी, शाळेत साठवणूक करून ठेवलेला पोषण आहार खराब होऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांना वितरीत करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांच्या माध्यमातून पालक, विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून तांदूळ, कडधान्य, डाळींचे वाटप करण्यात आले. कोरोना नियमांचे पालन करीत सर्व प्रक्रिया पार पडली.
- प्रदीप गायकवाड, शालेय पोषण आहार विभाग