‘शेती नव्याने समजुन घेताना’ पुस्तकाचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:18 IST2021-04-06T04:18:29+5:302021-04-06T04:18:29+5:30
ऑनलाईन झालेल्या प्रकाशन समारंभात ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शेषेराव मोहीते, पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे ...

‘शेती नव्याने समजुन घेताना’ पुस्तकाचे प्रकाशन
ऑनलाईन झालेल्या प्रकाशन समारंभात ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शेषेराव मोहीते, पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अशोक ढवण यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ.ढवण म्हणाले, शेती हा विषय व त्यावरील लिखाणाची गंभीर चर्चा होणे गरजेची असून त्यासाठी रमेश चिल्ले यांनी केलेलं लिखाण हे नव्याने या प्रश्नाची जाणीव निर्माण करण्यास प्रेरणादायी ठरेल. डॉ. मोहिते म्हणाले, शेती प्रश्न भावनिक न होता अर्थशास्त्रीय दृष्टीने विचार करून शेती व शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल हे बघणे गरजेच आहे. शेतीविषयक मध्यमवर्गीय शहरी भूमिकांनी प्रचंड नुकसान केले आहे. अतुल देऊळगावकर यांनी जागतिक प्रश्न आणि भविष्यातील मानवी अस्तित्वासमोरील धोके अधोरेखित करत माती, जमीन आणि पाणी याबद्दल आपण सर्वांनी गंभीर व विवेकी हस्तक्षेप करायला हवेत. अन्यथा आपण मोठ्या संकटात सापडणार आहोत, असे सांगितले. प्रास्ताविक दीपक कसाळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. पंचशील डावकर यांनी केले. राहुल लोंढे यांनी आभार मानले.
कॅप्शन - लातूर येथील रमेश चिल्ले लिखीत ‘ शेती नव्याने समजून घेताना’ व ‘वसुंधरेची आर्त हाक’ या पुस्तकांचे शनिवारी प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रा.डॉ. शेषेराव मोहिते, लेखक रमेश चिल्ले, प्रा. पंचशील डावकर.