शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण, दर्जेदार बियाणे, खत उपलब्ध करून द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:17 IST2021-04-26T04:17:35+5:302021-04-26T04:17:35+5:30
उदगीर, जळकोट आणि देवणी तालुक्यांच्या खरीप हंगामपूर्व नियोजन संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, ...

शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण, दर्जेदार बियाणे, खत उपलब्ध करून द्या
उदगीर, जळकोट आणि देवणी तालुक्यांच्या खरीप हंगामपूर्व नियोजन संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार रामेश्वर गोरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, कृषी विकास अधिकारी एस.आर. चोले, पंचायत समिती सभापती शिवाजीराव मुळे, बसवराज पाटील नागराळकर, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, कल्याण पाटील उपस्थित होते. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी एस.डी. तीर्थकर, तालुका कृषी अधिकारी संजय नाब्दे, आकाश पवार, महाबीजचे अधिकारी व कृषी निविष्ठा असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
तक्रार निवारण कक्ष स्थापन करावा...
यावेळी खरीप हंगामामधील प्रमुख पिकांसाठीची बियाणे, रासायनिक खतांच्या उपलब्धतेबाबत चर्चा झाली. कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या शेतीशाळा, पीक प्रात्यक्षिके, रेशीम शेती, विकेल ते पिकेल अभियानाबाबत चर्चा झाली. शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार बियाणे व खत मिळण्यासाठी प्रयत्नशील राहण्याबाबत राज्यमंत्री बनसोडे यांनी सूचना केल्या. तसेच तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यासाठीही सूचना केली. घरगुती सोयाबीन बियाणाबाबत शेतकऱ्यांनी उगवण क्षमता तपासून घ्यावी व पेरणी करावी, असे आवाहन केले.