इंधन दरवाढीच्या विराेधात उदगिरात पेट्राेल पंपावर आंदाेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:35 IST2021-03-04T04:35:34+5:302021-03-04T04:35:34+5:30

केंद्र सरकारने डिझेल, पेट्रोलवरील एक्साइज ड्यूटी लावून पेट्रोलचा दर प्रतिलिटर १०० रुपयांवर, तर डिझेलचा ९० रुपयांच्या घरात पाेहोचला आहे. ...

Protests at petrol pumps in protest of fuel price hike | इंधन दरवाढीच्या विराेधात उदगिरात पेट्राेल पंपावर आंदाेलन

इंधन दरवाढीच्या विराेधात उदगिरात पेट्राेल पंपावर आंदाेलन

केंद्र सरकारने डिझेल, पेट्रोलवरील एक्साइज ड्यूटी लावून पेट्रोलचा दर प्रतिलिटर १०० रुपयांवर, तर डिझेलचा ९० रुपयांच्या घरात पाेहोचला आहे. दररोज, इंधनाचे दर वाढत आहेत. यामुळे जनतेच्या खिशाला झळ बसत आहे. याविराेधात आंदाेलन केल्यानंतरही जनतेचा आवाज ऐकू येत नाही, असे मत लातूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक विजय निटुरे यांनी व्यक्त केले.

यावेळी उदगीर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मंजूरखाँ पठाण, अमोल कांडगिरे, विजयकुमार चवळे, अहमद सरवर, अमोल घुमाडे, नगरसेवक महेबूब शेख, अनिल मुदाळे, नाना ढगे, श्रीनिवास एकुर्केकर, रवी पाटील कौळखेडकर, सद्दाम बागवान, प्रकाश गायकवाड, अविनाश गायकवाड, यशवंत पाटील, ईश्वर संमगे, नंदकुमार पटणे, संजय काळे, महेंद्र पाटील कौळखेडकर, धनंजय पवार, राहुल सातापुरे, संतोष हणमंते, प्रीतम गोखले, अमोल ऐनिले, नवनाथ शिंदे, दत्ता सगर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Protests at petrol pumps in protest of fuel price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.