...
स्पर्धा परीक्षा देणा-यांसाठी अभ्यासिका उपलब्ध करावी
उदगीर : तालुक्यातील डोंगरशेळकी येथील तरुणांनी स्पर्धा परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उपलब्ध करुन देण्याची मागणी जिल्हा परिषद अध्यक्षांकडे करण्यात आली आहे. त्यावर ॲड. राजीव मुंडे, नरसिंग मुंडे, श्रीकांत कांबळे, एस.पी. मुंढे, अविनाश बरुरे, जी.टी. मुंडे, सचिन मुंडे, हर्ष मरेवाड, एम.जे. मुंडे, ईश्वर केंद्रे, गणेश जाधव, विकास मुंडे आदींच्या स्वाक्ष-या होत्या. दरम्यान, जि.प. अध्यक्षांनी प्रशासक व ग्रामसेवकांना लक्ष देण्याच्या सूचना केल्या आहेत.
...
दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ धरणे
उदगीर : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ येथील विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रशासनास निवेदन देण्यात आले. याप्रसंगी रंगा राचुरे, मौलाना हबीबरहेमान, अजित िशंदे, अहमद सरवर, राजकुमार अतनूरे, नगरसेवक सय्यद ताहेर हुसेन, महेबुब शेख, शमशुद्दीन जरगर, इमरोज हाश्मी, मौलाना नौशाद, जावेद बागवान, वसीम हाश्मी, श्रीनिवास एकुर्केकर आदी सहभागी झाले होते.
...
शेतकरी कृषीमाल विक्री केंद्र सुरु
औसा : शासनाच्या पिकेल ते विकेल या संकल्पनेच्या आधारावर तालुक्यातील उजनी येथील शेतकरी पांडुरंग तापडे यांनी शेतमाल विक्री केंद्र सुरु केले आहे. त्याचे उद्घाटन विभागीय कृषी सहसंचालक टी.एन. जगताप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, आत्माचे किरवले, भाजपा तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, तालुका कृषी अधिकारी संजय ढाकणे यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी शेतक-यांची उपस्थिती होती.
...
पिकासाठी माती परीक्षण महत्त्वाचे
औसा : शेती उत्पादन वाढीसाठी शेतक-यांनी माती परीक्षण करुन खतांचा वापर करावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले. जागतिक मृदा दिनानिमित्त उजनी येथे शेतक-यांशी संवाद साधण्यात आला. यावेळी कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अशोक ढवण, जगदीश पाटील, सागर तापडे यांची उपस्थिती होती. यावेळी मंडळ कृषी अधिकारी जी.बी. राऊत, कृषी पर्यवेक्षक व्ही.डी. लटूरे, कृषी सहाय्यक बी.एस. घाेडके, डी.एम. जाधव, पी.एफ. खडके, सी.बी. लातूरे, शितल जगताप, ए.पी. कंदले, दीपक वळके, मजहर पठाण, रघुनाथ वाळके, हरि ढवण, मैनोद्दीन शेरीकर, गोपाळ वळके यांची उपस्थिती होती.
...