प्रस्तावित चौपदरी मार्ग जळकोटमार्गे वळवावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:20 IST2021-05-19T04:20:13+5:302021-05-19T04:20:13+5:30
यासंबंधी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या जळकोट तालुका शाखेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. शिरूर ताजबंद ते मुखेड या मार्गाचे ...

प्रस्तावित चौपदरी मार्ग जळकोटमार्गे वळवावा
यासंबंधी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या जळकोट तालुका शाखेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. शिरूर ताजबंद ते मुखेड या मार्गाचे चौपदरी महामार्गात रूपांतर होणार असल्याचे समजत आहे. त्यामुळे जळकोट, अहमदपूर, मुखेड तालुक्यांत आनंदाचे वातावरण आहे. या भागाच्या विकासाला अधिक गती मिळणार आहे.
जळकोट ते जांब बु. हा महामार्ग तयार झालेला असून केवळ वांजरवाडा ते जळकोट या मार्गाचे रुंदीकरण करावे लागणार आहे.
प्रस्तावित चौपदरी मार्ग वांजरवाडा येथून जळकोटकडे व तेथून पुढे जांब बु. व मुखेडकडे वळविल्यास तालुक्याचे भाग्य उजळणार आहे.
त्यामुळे शिरूर ताजबंद ते मुखेड हा प्रस्तावित महामार्ग शिरूर ताजबंद- वांजरवाडा- जळकोट- जांब बु.- मुखेड असा वळविण्यात यावा, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने राज्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.