मांजरा धरणाच्या उजव्या कालव्याची तातडीने दुरुस्ती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:18 IST2021-03-28T04:18:20+5:302021-03-28T04:18:20+5:30
मांजरा धरणाचा उजवा कालवा फुटल्याची घटना समजताच आ. देशमुख यांनी तातडीने आवाड शिरपुरा गाठले. पात्रात उतरून फुटलेल्या कालव्याची पाहणी ...

मांजरा धरणाच्या उजव्या कालव्याची तातडीने दुरुस्ती करा
मांजरा धरणाचा उजवा कालवा फुटल्याची घटना समजताच आ. देशमुख यांनी तातडीने आवाड शिरपुरा गाठले. पात्रात उतरून फुटलेल्या कालव्याची पाहणी केली. कालव्याची तातडीने दुरुस्ती करा. तसेच, कालव्याचा शेवटचा शेतकरी पाण्यापासून वंचित राहणार नाही, त्यांची गैरसोय होणार नाही, याचीही दक्षता घ्या, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.
या वेळी रेणा कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, ट्वेन्टी वन शुगर्सचे व्हाइस चेअरमन विजय देशमुख, विलास साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन रवींद्र काळे, संजय गांधी निराधार कमिटीचे चेअरमन प्रवीण पाटील, लातूर तालुकाध्यक्ष सुभाष घोडके, रेणापूर तालुकाध्यक्ष प्रमोद जाधव, गोविंद बोराडे, अनंत बारबोले, बादल शेख, प्रताप पाटील, कार्यकारी अभियंता अभिजित नितनवरे, उपअभियंता सिद्धारामेश्वर जावळी, शाखा अभियंता एस.डी. पाटील, बिटप्रमुख पंडितराव आवाड आदी उपस्थित होते.
कॅप्शन : मांजराच्या उजव्या कालव्याची पाहणी...
मांजरा धरणाचा उजवा कालवा आवाड शिरपुरा (ता. कळंब) येथे फुटला असल्याने लातूर ग्रामीणचे आ. धीरज देशमुख यांनी शनिवारी पाहणी केली. या वेळी सर्जेराव मोरे, विजय देशमुख, रवींद्र काळे, प्रवीण पाटील, सुभाष घोडके, कार्यकारी अभियंता अभिजित नितनवरे, सिद्धरामेवश्वर जावळी, एस.डी. पाटील.