शेतकऱ्यांना खरीप हंगामातील विम्याचे तातडीने वाटप करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:22 IST2021-03-09T04:22:09+5:302021-03-09T04:22:09+5:30
शिवारात अनेक शेतकऱ्यांचे शेतच वाहून गेले आहे. मात्र, त्यांना विमा मिळाला नाही. एकीकडे अतिवृष्टीमुळे सरकारने शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करत ...

शेतकऱ्यांना खरीप हंगामातील विम्याचे तातडीने वाटप करा
शिवारात अनेक शेतकऱ्यांचे शेतच वाहून गेले आहे. मात्र, त्यांना विमा मिळाला नाही. एकीकडे अतिवृष्टीमुळे सरकारने शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करत अनुदान वाटपही केले. मात्र, त्याच शेतकऱ्याला विमा कंपनी विमा देणार नसेल तर आंदाेलन केले जाणार आहे. शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा द्यावा, तसेच उशीर झाल्यामुळे तो व्याजासह वाटप व्हावा, प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या पंचनाम्याची प्रत देण्यात यावी, जेणेकरुन कंपनीने पीक कापणी प्रयोग करताना आणेवारी सरासरी कशी काढली आहे, हे प्रत्येक शेतकऱ्यांना समजेल. असेही निवदेनात म्हटले आहे.
या सर्व मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अहमदपूर तहसीलसमोर गुरुवारी सकाळी ११ वाजता धरणे आंदोलन करणार आहे, असे मनसे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे यांनी सांगितले. यावेळी तालुकाध्यक्ष डॉ. मिलिंद साबळे, शहराध्यक्ष अतिष गायकवाड, तालुका उपाध्यक्ष उत्तम मुरकुटे, गणेश शेटकर, अमोल खराबे, कार्तिक भिकाणे आदी उपस्थित होते.