कोरोनाबाधित रुग्णांना तत्पर आरोग्य सेवा द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:19 IST2021-04-18T04:19:01+5:302021-04-18T04:19:01+5:30
यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपविभागीय अधिकारी अविनाश ...

कोरोनाबाधित रुग्णांना तत्पर आरोग्य सेवा द्यावी
यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार राहुल पाटील, गटविकास अधिकारी मोहन अभंगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नारायण देशमुख, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मंगेश शिंदे, पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे, रेणापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आनंद कर्नावट, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. प्रमोद जाधव, संगायो कमिटीचे तालुकाध्यक्ष गोविंद पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष मतीनअली सय्यद, ॲड. प्रशांत आकनगिरे, नगरसेवक राम जोगदंड, भूषण पनुरे, अजय चक्रे, युवा मंचचे शहराध्यक्ष सचिन इगे, डॉ. मोहिते, डॉ. भोसले, डॉ. सय्यद, आदी उपस्थित होते.
लसीकरणावर लक्ष केंद्रित करावे...
पालकमंत्री अमित देशमुख यांनी कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. आवश्यक औषधे व साठा करण्याबाबत संबंधितांना निर्देश दिले. औषधांची मागणी व पुरवठा, ऑक्सिजन, होम आयसोलेशनमधील रुग्ण, खाटांची उपलब्धता, व्हेंटिलेटर, आदींची माहिती घेतली. ऑक्सिजनयुक्त खाटांची संख्या वाढवावी. लसीकरणास अधिक गती द्यावी. बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन चाचण्यांवर भर द्यावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.