सरदार वल्लभभाई पटेल विद्यालयात कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:03 IST2021-01-08T05:03:12+5:302021-01-08T05:03:12+5:30

... भादा प्रशालेतील विद्यार्थिनीची निवड औसा : तालुक्यातील भादा येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेतील इयत्ता ८ वीतील अलमास मुजिबोद्दीनखोजे ...

Program at Sardar Vallabhbhai Patel Vidyalaya | सरदार वल्लभभाई पटेल विद्यालयात कार्यक्रम

सरदार वल्लभभाई पटेल विद्यालयात कार्यक्रम

...

भादा प्रशालेतील विद्यार्थिनीची निवड

औसा : तालुक्यातील भादा येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेतील इयत्ता ८ वीतील अलमास मुजिबोद्दीनखोजे हिने केंद्र शासनाच्या इन्स्पायर अवॉर्ड योजनेत सहभाग घेऊन गुणवत्ता सिद्ध केली. शाळेतील विज्ञान शिक्षक शिवलिंग नागापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी झालेल्या या विद्यार्थिनीची इन्स्पायर अवॉर्ड २०२०- २१ साठी निवड झाली आहे. याबद्दल तिचा प्रशालेचे मुख्याध्यापक रमेश अनंतवार यांनी सत्कार केला.

...

निलंग्यात सुंदर माझे कार्यालय अभियान

निलंगा : जिल्हा परिषदेच्या वतीने सुंदर माझे कार्यालय अभियान राबविण्यात येत असून येथील पंचायत समितीत गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानास सुरुवात करण्यात आली. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी ए. बी. चव्हाण, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी पी. एन. कदम, पद्माकर पाटील, महेश शानिमे, जे. के. अंतरेड्डी, रज्जाक बागवान, बालाजी भोसले, रमेश फुले, नरेंद्र चव्हाण, किशोर सूर्यवंशी, रवि डोंगरगे आदी उपस्थित होते.

Web Title: Program at Sardar Vallabhbhai Patel Vidyalaya