सचिन शिंदे मित्र मंडळातर्फे कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:20 IST2021-01-20T04:20:30+5:302021-01-20T04:20:30+5:30
प्रकाशनगर येथून शहर बससेवा सुरू लातूर : बार्शी रोडवरील प्रकाशनगर येथील सरस्वती विद्यालय समोरून महापालिकेच्या वतीने शहर बससेवा सुरू ...

सचिन शिंदे मित्र मंडळातर्फे कार्यक्रम
प्रकाशनगर येथून शहर बससेवा सुरू
लातूर : बार्शी रोडवरील प्रकाशनगर येथील सरस्वती विद्यालय समोरून महापालिकेच्या वतीने शहर बससेवा सुरू करण्यात आली. ही बस पाण्याच्या टाकी मार्गे गंजगोलाई, श्री सिद्धेश्वर चौक व इक्बाल चौकापर्यंत सुरू करण्यात आली आहे. या बससेवेचे उद्घाटन पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे, नगरसेवक कमल सोमवंशी, योजना कामेगावकर, पप्पू देशमुख, अयुब मणियार, दत्ताभाऊ सोमवंशी, नागसेन कामेगावकर, सूर्यकांत कातळे, नागेश जोगदंड यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
भाजप उद्योग आघाडीच्या उपाध्यक्षपदी भोसले
लातूर : भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अंगद मुकुंदराव भोसले यांची भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा आ. रमेश कराड यांनी पत्र देऊन नियुक्ती केली आहे. यावेळी रेणापूर भाजपाचे तालुकाध्यक्ष दशरथ सरवदे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर चेवले, पं.स. उपसभापती आनंद चव्हाण यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. या निवडीचे राजेश कराड, बन्सी भिसे, बाबासाहेब घुले यांच्यासह अनेकांनी स्वागत केले आहे.
मैदानी निवड चाचणी स्पर्धेत खेळाडूंचा सहभाग
लातूर : लातूर जिल्हा ॲथेलेटिक्स असोसिएशन व महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या वतीने उदगीर येथे जिल्हास्तरीय ज्युनिअर ॲथेलेटिक्स निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली. कोविडच्या नियमांचे पालन करून ही निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली. यात जिल्ह्यातील १५० खेळाडूंनी सहभाग नोंदविला. यशस्वितेसाठी संघटनेचे पदाधिकारी ॲड. विक्रम संकाये, प्रा.व्ही.आर. हुडगे, निजाम शेख, प्रा. सतीश मुंढे, प्रा. शिवकुमार कोळ्ळे, प्रा. सचिन चामले यांनी परिश्रम घेतले.