प्राध्यापक, शिक्षकांनी मुख्यालयी रहावे, लोकायत शिक्षण मंडळाच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:24 IST2021-08-14T04:24:14+5:302021-08-14T04:24:14+5:30
जे मुख्यालयी राहत नाहीत, त्यांची चौकशी करण्यासाठी समिती गठित करण्यात आली असून त्यांच्यावर कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ...

प्राध्यापक, शिक्षकांनी मुख्यालयी रहावे, लोकायत शिक्षण मंडळाच्या सूचना
जे मुख्यालयी राहत नाहीत, त्यांची चौकशी करण्यासाठी समिती गठित करण्यात आली असून त्यांच्यावर कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. समितीचे अध्यक्ष संस्थेचे उपाध्यक्ष आबासाहेब देशमुख आहेत. समितीत सदस्यपदी प्राचार्य व अन्य सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. दररोज ये- जा करण्यामुळे शिक्षणावर काहीसा परिणाम होतो. शासनाच्या आदेशानुसार प्राध्यापक, शिक्षकांनी मुख्यालयी राहिले पाहिजे. जे राहणार नाहीत, त्यांचे घरभाडे बंद करण्याचा आणि त्यांच्यावर कार्यवाही करण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे, असे संस्थेचे उपाध्यक्ष आबासाहेब देशमुख यांनी सांगितले. शहरातील अन्य शैक्षणिक संस्थांनीही हा उपक्रम सुरु करुन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीकडे लक्ष द्यावे, असे आवाहन संस्थेचे सचिव ॲड. पी.डी. कदम यांनी केले.
लोकायतचे कौतुक...
मुख्यालयी राहण्यासाठी लोकायत शिक्षण मंडळाने घेतलेली भूमिका समाजाभिमुख आहे. त्यामुळे प्राध्यापक, शिक्षक मुख्यालयी राहतील. त्यातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक लाभ मिळणार आहे. संस्थेच्या या निर्णयाचे चाकूर संघर्ष समिती स्वागत करीत आहे, असे सुधाकरराव लोहारे म्हणाले.