तासिका तत्वावरील प्राध्यापक शेतमजुरीवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:25 IST2021-09-08T04:25:03+5:302021-09-08T04:25:03+5:30
किती दिवस जगायचे असे? मी गेल्या दहा ते बारा वर्षांपासून तासिका तत्त्वावर शिकविण्याचे काम करतो. आठवड्याचे ९ तास मिळतात. ...

तासिका तत्वावरील प्राध्यापक शेतमजुरीवर!
किती दिवस जगायचे असे?
मी गेल्या दहा ते बारा वर्षांपासून तासिका तत्त्वावर शिकविण्याचे काम करतो. आठवड्याचे ९ तास मिळतात. पंधरा ते सोळा हजार मासिक मानधन होते. त्यातूनच गुजरण करावी लागते. अन्य वेळामध्ये मी दुसरे काम करतो. प्रा.राजकुमार मोरे, लातूर
मी दहा वर्षे झाले तासिका तत्वावर काम करतोय. ७० हजार रुपये वार्षिक मानधन त्यातून मिळते. मात्र गेल्या दीड वर्षांपासून विद्यापीठाकडून मानधन मिळालेले नाही. अन्य व़ेळेत काम धंदा करून पोट भागवावे लागते. तास घेण्यापासून परीक्षेचे सर्वच कामे तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांकडून करून घेतली जातात. मात्र मानधन वाढविले जात नाही. महिन्याला फिक्स मानधन देण्याची गरज आहे.
प्रा. डॉ. संग्राम टेकले लातूर
दहा ते बारा वर्षांपासून मी आणि माझे अनेक मित्र तासिका तत्त्वावर विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम करतो. आठवड्याला नऊ तास विद्यापीठाकडून ग्राहय आहेत. त्यापेक्षा अधिक तास काम केले जाते. परंतु विद्यापीठाकडून त्याचे मानधन मिळत नाही. कामे करून घेतली जातात. शासन, विद्यापीठ अनुदान आयोग आणि विद्यापीठाकडून तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या मागण्या कडे दुर्लक्ष होत आहे.
प्रा. डॉ.रामशेट्टी शेटकार, लातूर