वीज ग्राहकांच्या समस्या तत्काळ सोडवाव्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:42 IST2021-09-02T04:42:45+5:302021-09-02T04:42:45+5:30
तालुक्यातील शेतकऱ्यांसह वीज ग्राहकांच्या समस्या संदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस कार्यकारी अभियंता सामसे, उपकार्यकारी अधिकारी दीपक ...

वीज ग्राहकांच्या समस्या तत्काळ सोडवाव्यात
तालुक्यातील शेतकऱ्यांसह वीज ग्राहकांच्या समस्या संदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस कार्यकारी अभियंता सामसे, उपकार्यकारी अधिकारी दीपक थोरात, शाखा अभियंता पवन शिंत्रे, नितीन मुंडे, माधुरी चौधरी यांच्यासह पंचायत समितीचे सभापती रमेश सोनवणे, नगराध्यक्षा आरती राठोड, उपनगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे, माजी सभापती अनिल भिसे, भाजपा शहराध्यक्ष दत्ता सरवदे, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष शरद दरेकर, वसंत करमुडे, नरसिंग येलगटे, उज्ज्वल कांबळे, संजय डोंगरे, भूषण संपत्ते, श्रीकृष्ण मोटेगावकर, मारूती गालफाडे, प्रशांत डोंगरे आदी उपस्थित होते.
बैठकीत डीपी बंद, नवीन डीपी मिळत नाही, पैसे भरले मात्र वीज जोडणी केली जात नाही, वाढीव वीजबिल, शेती आणि काही गावांत पोल आडवे पडले, सार्वजनिक पाणीपुरवठ्यासाठी वीज पुरवठ्याची अनियमितता, लाईनमनची मनमानी, बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजनेची वीजबिल आकारणी अशा समस्या मांडण्यात आल्या. यावेळी रेणापूर, आनंदवाडी, कुंभारवाडी, गरसुळी, पानगाव, फरदपूर, घनसरगाव, पोहरेगाव, कुंभारी, भोकरंबा, रामवाडी, टाकळगाव, खरोळा, गव्हाण, कारेपूर यासह अन्य गावांतील नागरिक उपस्थित होते. बैठकीस संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी उपस्थित प्रश्नांना उत्तरे दिली. जे प्रश्न सहज सोडवणे शक्य आहेत, ते तत्काळ सोडविले जातील. उर्वरित प्रश्न वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन निकाली काढण्यात येतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.