अहमदपुरातील वाहतूक कोंडीची समस्या कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:19 IST2021-03-31T04:19:47+5:302021-03-31T04:19:47+5:30
अहमदपूर शहरातील आझाद चौकात मुख्य बाजारपेठ असून, शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातून खरेदी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची, वाहनांची माेठ्या प्रमाणावर वर्दळ ...

अहमदपुरातील वाहतूक कोंडीची समस्या कायम
अहमदपूर शहरातील आझाद चौकात मुख्य बाजारपेठ असून, शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातून खरेदी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची, वाहनांची माेठ्या प्रमाणावर वर्दळ असते. आझाद चौकातील मुख्य रस्त्याच्या मधोमध ऑटाे थांबलेले असतात. त्याचबराेबर रस्त्याच्या मधोमध भाजीपाला विक्री करणारेही बसलेले असतात. यातून या परिसरात वाहतूकीची कोंडी होत आहे.
याच चौकात अस्ताव्यस्त वाहने थांबत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडली आहे. सदरील बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिक दाखल हाेतात. त्यावेळी अनेक वाहनधारक आपली वाहनेही रस्त्यावरच थांबवत असल्याने वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. बाजारपेठेतील वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था नाही. शहरातील अंतर्गतग रस्त्यावर ही समस्या कायमच आहे. अरुंद रस्ते, त्यातच दुचाकी- चारचाकी वाहनांनी हाेणारी बेशिस्त पार्किंग यामुळे सतत वाहतुकीची कोंडी होत आहे. या चाैकातील वाहतूक काेंडीवर उपाय याेजना करण्यासाठी आता सकाळ आणि सायंकाळच्या वेळेत एखाद्या पाेलीस कर्मचाऱ्याची नेमणूक करण्याची गरज आहे. रस्त्यावर भाजीपाला विक्री करत असलेल्याची आणि ऑटाेधारकांची नगरपालिकेने कायमस्वरूपी साेय करावी, अशी मागणीही नागरिकांतून हाेत आहे. दरम्यान, नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्र्यंबक कांबळे यांच्याशी संपर्क साधले असता, ते म्हणाले औझाद चाैकातील भाजीपाला विक्री करणाऱ्यांना, त्याचबराेबर ऑटाेचालाकांना लवकरात लवकर थांबा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
स्थानिक नागरिक, व्यापाऱ्यांची हेळसांड...
अहमदपूर शहरातील अंतर्गत रस्त्यांची रुंदी फारच कामी आहे. अरुंद रस्त्यामुळे शहरात ठिकठिकाणी वाहतुकीची काेंडी हाेत आहे. परिणामी, स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांची माेठ्या प्रमाणावर हेळसांड हाेत आहे. त्याचबराेबर बसस्थानक परिसरात, छत्रपती शिवाजी चाैक परिसरातही वाहतूक काेंडी असते. अहमदपूर शहरातील वाहतूक काेंडीची समस्या कायम आहे. संबंधित प्रशासनाकडून यावर उपाययाेजना आखल्या जात नसल्याचा आराेप संतप्त नागरिकांतून हाेत आहे. तर ही वाहतूक काेंडी शहरातील नागरिकांसाठी डाेकेदुखी ठरली आहे.
फाेटाे ओळी :
अहमदपूर शहरातील आझाद चौक परिसरात वाहतूक कोडींमुळे सतत वाहनांच्या अशा रांगा लागलेल्या असतात.