बक्षीस रकमेच्या विनियोगावर होणार खल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:19 IST2021-03-08T04:19:53+5:302021-03-08T04:19:53+5:30
जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय व मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन करून त्यास मंजुरी देण्यासाठी गुरुवारी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. ...

बक्षीस रकमेच्या विनियोगावर होणार खल
जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय व मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन करून त्यास मंजुरी देण्यासाठी गुरुवारी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. सभा सुरू होताच जिल्हा परिषद सदस्य डॉ. संतोष वाघमारे यांनी पंचायत राज अभियानाअंतर्गत बक्षिसापोटी मिळालेल्या रकमेच्या विनियोगासाठी सर्वसाधारण सभेत मंजुरी घेण्यात आली नसल्याचा आरोप केला होता. तेव्हा अशोक केंद्रे यांनी ठराव मांडला नसल्याचे सांगितले तर सुरेंद्र गोडभरले यांनी सदरील ठरावास अनुमोदन दिले नसल्याचे सभेत सांगितले. दरम्यान, डॉ. वाघमारे यांनी सदरील रकमेचा विनियोग हा जास्तीत जास्त महागड्या वस्तू खरेदीसाठी करण्यात आला असल्याचे सांगून त्याचे दोन दिवसांत पुरावे देणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे आजच्या सभेत ते पुरावे देणार का, याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, सत्ताधारी पक्षाचे सदस्य रामचंद्र तिरुके, संजय दोरवे यांनी मागील सभेचे इतिवृत्त न देता त्यापूर्वीच्या सभेचे इतिवृत्त प्रशासनाने दिले असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. तसेच अर्थसंकल्पाची व इतर विषयांची वेगळी सभा घेण्याची मागणी केली होती. त्यामुळे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी सभा तहकूब करून सोमवारी सभा होणार असल्याचा निर्णय घेतला होता.