तुरुंगातील आरोपी कोरोना पॉझिटिव्ह, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:18 IST2021-03-15T04:18:34+5:302021-03-15T04:18:34+5:30
पोलिसांनी सांगितले, अहमदपूर पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात तीन आरोपींना उदगीर शहरातून ताब्यात घेतले हाेते. त्यांची अहमदपूर येथील पोलीस ठाण्याच्या तुरुंगात ...

तुरुंगातील आरोपी कोरोना पॉझिटिव्ह, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी
पोलिसांनी सांगितले, अहमदपूर पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात तीन आरोपींना उदगीर शहरातून ताब्यात घेतले हाेते. त्यांची अहमदपूर येथील पोलीस ठाण्याच्या तुरुंगात रवानगी करण्यात आली हाेती. दम्यान, कोठडीत दुसऱ्या गुन्ह्यातील तीन आरोपीही दाखल झाले. एकूण सहा आरोपींचा एकाच तुरुंगात रात्रभर मुक्काम हाेता. सकाळी आरोपींना अहमदपूर येथील न्यायालयात हजर करण्यासाठी त्यांची वैद्यकीय चाचणी केली असता, त्याच्यात उदगीर येथील चोरीच्या गुन्ह्यात ताब्यात असलेल्या एका आरोपीचा अहवाल काेराेना पाॅझिटिव्ह आला. परिणामी, पाेलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली. इतर आराेपींचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना थेट न्यायालयात हजर करण्यात आले. तर काेराेना पाॅझिटिव्ह असलेल्या आराेपीची सुनावणी थेट व्हिडिओ काॅन्फ्फरन्सच्य माध्यमातून झाली. आराेपींच्या संपर्कात आलेल्या पाेलीस कर्मचाऱ्यांची काेराेना चाचणी करण्यात आली. यातील अहवाल निगेटिव्ह आला आहे. परिणामी, या आरोपीला कुठे ठेवायचे, हा प्रश्न निर्माण झाल्यानंतर त्यास न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला ४५ दिवसांच्या जामिनावर मुक्त केले आहे. त्याला उपचारासाठी कोविड केअर सेंटर येथे ठेवण्याविषयी निर्णय घेण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत आरोपींना कोठडीत ठेवताना कोरोनाची चाचणी करणे गरजेचे आहे. मात्र, पोलिसांनी याबाबत निष्काळजीपणा केल्याचा समाेर आले आहे. आता पूर्ण पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची काेराेना चाचणी करण्याची वेळ आली आहे. सदर काेराेनाची बाधा झालेल्या आराेपीला अहमदपूर येथील काेविड केअर सेंटरमध्ये ठेवले जाणार आहे. संबंधित आरोपीला जामीन मिळाला असून, त्याच्यावर काेविड केअर सेंटरमध्ये उपचार केले जाणार आहेत. असा निर्णय घेण्यात आल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय बिराजदार म्हणाले.
मंदावलेला काेरोना डाेके काढताेय वर...
लातूर शहरासह जिल्ह्यातील उदगीर, जळकाेट, अहमदपूर आणि इतर ठिकाणी काेराेनाची रुग्णसंख्या आता दिवसेंदिवस वाढत आहे. याला राेखण्यासाठी जिल्हा प्रशासन, स्थानिक प्रशासनाच्या वतीने विविध उपाययाेजना राबविल्या जात आहेत. लातूर शहरात रात्रीची संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. शिवाय, गर्दीच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. लग्नसाेहळ्यांनाही आता प्रशासनाकडून नियमावली लागू करण्यात आली आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे प्रशासन सतर्क झाले आहे. जळकाेट तालुक्यातही रुग्णांची संख्या वाढत आहे. मध्यंतरीच्या कालावधीत मंदावलेला काेराेना आता डाेके वर काढत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, नागरिकांनी काळजी घेण्याची गरज असल्याचे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.