बाधितांना उपचारासह सुविधा पुरविण्यास प्राधान्य द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:20 IST2021-04-07T04:20:13+5:302021-04-07T04:20:13+5:30
माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी निलंगा येथील उपविभागीय कार्यालयात काेराेना परिस्थिती आढावा बैठक घेतली. यावेळी उपविभागीय अधिकारी ...

बाधितांना उपचारासह सुविधा पुरविण्यास प्राधान्य द्या
माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी निलंगा येथील उपविभागीय कार्यालयात काेराेना परिस्थिती आढावा बैठक घेतली. यावेळी उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार गणेश जाधव, गटविकास अधिकारी अमोल ताकभाते, आरोग्य अधिकारी डॉ. श्रीनिवास कदम, डॉ. दिलीप सौंदाळे, नगर पालिकेचे मुख्याधिकारी मल्लीकार्जुन पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश चिद्रे यांच्यासह विभाग प्रमुखाची उपस्थिती होती.
राज्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढू लागला असून, लातूर जिल्ह्यातही बाधितांची संख्या वाढत आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी, त्याबाबतचा आढावा घेण्यासाठी माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी रुग्णांना वेळेवर औषधोपचार करुन आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. यासाठी प्रशासनाने कोणतीही हयगय करु नये, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. संसर्ग वाढू नये, त्याचबरोबर त्यास प्रतिबंध घालण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनाही तातडीने सुरु केलेल्या असून, त्यास अधिक गती द्यावी. असेही ते म्हणाले. निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी, मदनसुरी, रामलिंग मुदगड येथे नव्याने बांधण्यात आलेल्या रुग्णालयात कोरोनाची तपासणी आणि उपचारारासाठी तातडीने सुविधा उपलब्ध कराव्यात, असे निर्देश माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी यावेळी दिले.
व्हेंटिंलेटरची कमतरता भासणार नाही...
कसल्याही परिस्थितीत रुग्णांना लाणाऱ्या सुविधा आणि व्हेंटिलेटरची कमतरता भासणार नाही, याकडे प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे. शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन काटोकोरपणे करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात यावीत. यासाठी नागरीकांनी सहकार्य करावे, विशेषतः साठ वर्षावरील नागरीकांनी कोरोना काळात विनाकारण घराबाहेर पडू नये. असे आवाहन माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी केले. यावेळी उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनाची माहिती दिली.
पाणीटंचाई, घरकुलांची घेतली माहिती...
आढावा बैठकीत पाणीटंचाईबराेबरच घरकूल याेजनेची माहिती त्यांनी घेतली. टंचाईकाळात ज्या गांवामध्ये विंधन विहीर, विहीरी अधिग्रहन करणे आवश्यक आहे. या गावांची माहिती संकलीत करावाी, याची यादी तयार करण्यासाठी शिरुर अनंतपाळ, देवणी, निलंगा येथील गटविकास अधिकाऱ्यांना माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी सूचना केल्या. त्याचबरोबर याबाबत आवश्यक असणारा कृती आराखडा तातडीने तयार करून विहीरी, विंधन विहीर पुनर्भरणासाठी प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे, असेही ते म्हणाले.