प्राचार्य अनिरुद्ध जाधव यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:24 IST2021-09-09T04:24:56+5:302021-09-09T04:24:56+5:30

लातूर : लातूर शैक्षणिक पॅटर्नचे जनक, राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य अनिरुद्ध जाधव यांनी ‘मनाशी संवाद’ हे आत्मचरित्र लिहिल्याबद्दल सर्वोत्तम ...

Principal Aniruddha Jadhav felicitated | प्राचार्य अनिरुद्ध जाधव यांचा सत्कार

प्राचार्य अनिरुद्ध जाधव यांचा सत्कार

लातूर : लातूर शैक्षणिक पॅटर्नचे जनक, राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य अनिरुद्ध जाधव यांनी ‘मनाशी संवाद’ हे आत्मचरित्र लिहिल्याबद्दल सर्वोत्तम चॅरिटेबल ट्रस्ट व क्रेडाई, लातूरच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

लातूरमध्ये सर्व क्षेत्रात प्रगती होत आहे. या विकासात व सांस्कृतिक वारसा जपण्यात ज्यांनी लातूरचा शैक्षणिक पॅटर्न मजबूत केला, त्यामध्ये प्राचार्य अनिरुद्ध जाधव यांचा सिंहाचा वाटा आहे. साहित्य क्षेत्रात एका चांगल्या अनुभव कथन कादंबरीची भर पडली असून, पुढील पिढीला हे पुस्तक निश्चितपणे मार्गदर्शक ठरणार आहे. म्हणूनच सर्वोत्तम परिवार व क्रेडाई परिवाराच्यावतीने प्राचार्य अनिरुद्ध जाधव यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उदय पाटील, रंजना चव्हाण, खय्युम सय्यद, उत्तम शेळके, दत्तात्रय दापके, तृप्ती आंधुरे, कल्पना पवार, जीवनकला जाधव, महेश नावंदर, संतोष हात्ते, नागनाथ गित्ते, योगेश सांडूर, रणवीर उमाटे, सचिन आहेरकर, रणवीर सूर्यवंशी, विष्णू मदने आदी उपस्थित होते.

Web Title: Principal Aniruddha Jadhav felicitated