जळकोटातील मंगरूळ, घोणसी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:25 IST2021-06-09T04:25:03+5:302021-06-09T04:25:03+5:30
जळकोट तालुक्यातील अनेक गावांतील भेटी व कार्यक्रमात पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी ही माहिती दिली. मंगरुळ, घोणसी आणि वाढवणा ...

जळकोटातील मंगरूळ, घोणसी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र
जळकोट तालुक्यातील अनेक गावांतील भेटी व कार्यक्रमात पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी ही माहिती दिली. मंगरुळ, घोणसी आणि वाढवणा येथील आरोग्य केंद्र मंजूर केल्याचे सांगत राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री अमित देशमुख, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे जळकोट तालुक्याला सदरचे रुग्णालय मंजूर झाले आहे. याप्रसंगी उदगीर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कल्याण पाटील, पंचायत समितीचे सभापती शिवाजीराव मुळे, रामराव बिरादार, प्रशांत देवशेट्टी, रामराव राठोड, जिल्हा परिषदचे सदस्य ज्ञानेश्वर पाटील, प्रा. श्याम दावळे, तालुका अध्यक्ष अर्जुन पाटील आगलावे बाजार समितीचे माजी सभापती मन्मथ किडे, सरपंच चंद्रशेखर पाटील, पाशा शेख, तहसीलदार संदीप कुलकर्णी, गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे, पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे, राष्ट्रवादीचे युवा तालुकाध्यक्ष सत्यवान पाटील दळवे, बाजार समितीचे माजी कृषी अधिकारी आकाश पवार आदी उपस्थित होते.