बालरोग संघटनेच्या अध्यक्षपदी डाॅ. कदम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:23 IST2021-02-05T06:23:46+5:302021-02-05T06:23:46+5:30
लातूर : बालरोग संघटनेच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा रविवारी झाला. संघटनेच्या अध्यक्षपदी डाॅ. ज्ञानेश्वर कदम तर सचिवपदी डाॅ. ...

बालरोग संघटनेच्या अध्यक्षपदी डाॅ. कदम
लातूर : बालरोग संघटनेच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा रविवारी झाला. संघटनेच्या अध्यक्षपदी डाॅ. ज्ञानेश्वर कदम तर सचिवपदी डाॅ. पद्मसिंह बिराजदार यांची निवड करण्यात आली.
पदग्रहण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सीपीएस मुंबईचे अध्यक्ष डाॅ. गिरीश मैंदरकर, भारतीय बालरोगतज्ज्ञ परिषदेचे अध्यक्ष डाॅ. पारिख बकुल, महाराष्ट्र राज्य बालरोगतज्ज्ञ परिषदेचे अध्यक्ष डाॅ. संजय घोरपडे, डाॅ. अतुल कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
लातूर जिल्हा कार्यकारिणीत डाॅ. जितेन जैस्वाल, डाॅ. नारायण नागमोडे, कोषाध्यक्षपदी डाॅ. असद पठाण, तर सहसचिवपदी डाॅ. किरण होळीकर, डाॅ. अर्चना कोंबडे, डाॅ. सतीश पाटील, डाॅ. नंदकिशोर पांचाळ यांच्यासह अभ्यास मंडळावर डाॅ. शिल्पा दडगे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डाॅ. सुरेश भट्टड, डाॅ. महेश सोनार, मावळते अध्यक्ष डाॅ. गोपाळ जाजू आदींची उपस्थिती होती. निवडीचे स्वागत डाॅ. उदय मोहिते-पाटील, डाॅ. अभय कदम, डाॅ. सचिन इंगळे, डाॅ. विशाल मैंदरकर, डाॅ. हनुमंत किनीकर, डाॅ. प्रदीप इंदलकर यांनी केले.