मान्सूनपूर्व वीज दुरुस्तीची कामे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:21 IST2021-05-20T04:21:11+5:302021-05-20T04:21:11+5:30

... मान्सूनपूर्व शेती मशागतीत शेतकरी व्यस्त औसा : खरीप हंगाम तोंडावर आल्याने तालुक्यातील शेतकरी मान्सूनपूर्व मशागतीच्या कामात व्यस्त असल्याचे ...

Pre-monsoon power repair work started | मान्सूनपूर्व वीज दुरुस्तीची कामे सुरू

मान्सूनपूर्व वीज दुरुस्तीची कामे सुरू

...

मान्सूनपूर्व शेती मशागतीत शेतकरी व्यस्त

औसा : खरीप हंगाम तोंडावर आल्याने तालुक्यातील शेतकरी मान्सूनपूर्व मशागतीच्या कामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. यंदा डिझेलच्या दरात वाढ झाल्याने ट्रॅक्टरच्या सहाय्याने करण्यात येणाऱ्या शेती कामांच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे बहुतांश शेतकरी पारंपरिक पद्धतीने बैलांच्या मदतीने मोगडणी, कुळवाच्या पाळ्या, शेतात खत टाकणे अशी कामे करीत आहेत. सध्या शेतकऱ्यांची शेती कामे उरकण्यासाठी लगबग सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे.

...

सावरीच्या शिबिरात २५ जणांचे रक्तदान

निलंगा : तालुक्यातील सावरी येथे मंगळवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यात २५ जणांनी रक्तदान केले. कोरोनाच्या संसर्गामुळे रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे उपसरपंच पाटील यांच्या पुढाकारातून हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी सरपंच सुजाता साळुंके, उपसरपंच अमोल पाटील, दिग्विजय पाटील, मुरलीधर अंचुळे, संजय सोळुंके, नीताताई डोंगरे, भाग्यश्री ओगले, हारुबाई येरोळे आदी उपस्थित होते. या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Web Title: Pre-monsoon power repair work started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.