लिंगायत महासंघाच्या शहराध्यक्षपदी प्रकाश तोंडारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:19 IST2021-03-19T04:19:04+5:302021-03-19T04:19:04+5:30

लिंगायत महासंघाच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा. सुदर्शन बिरादार हे होते. उदगीरच्या ...

Prakash Tondare as the city president of Lingayat Federation | लिंगायत महासंघाच्या शहराध्यक्षपदी प्रकाश तोंडारे

लिंगायत महासंघाच्या शहराध्यक्षपदी प्रकाश तोंडारे

लिंगायत महासंघाच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा. सुदर्शन बिरादार हे होते. उदगीरच्या शहराध्यक्षपदी प्रकाश तोंडारे यांची तर उपाध्यक्षपदी प्रभूराज कप्पीकेरे, प्रा. सिद्राम शेटकार, प्रा. अडेप्पा अंजुरे व बस्वराज विश्वनाथे यांची निवड करण्यात आली. शिवाजी स्वामी यांची शहर सरचिटणीस, प्रकाश करेप्पा व सुशील जीवने यांची सहसचिव, तर शहर कोषाध्यक्षपदी शंकरराव हुडे व सहकोषाध्यक्ष म्हणून महेश चनाळे यांची निवड करण्यात आली. सदस्य म्हणून शिवराज रंडाळे, शिवराज तोंडारे, हणमंत बुळ्ळा, कांता बुळ्ळा, संजय नरसिंग शाहीर, संजय किशोर शाहीर, नंदकुमार शाहीर, चनबस झुंगा, वैभव तोंडारे, विश्वभूषण निलंकर, समिरण कप्पीकेरे, अमित चनाळे, आनंद बसपुरे, नीलेश निलंगे, मल्लेश निलंगे, किशोर निल्लकर, अमर बसापुरे यांची निवड करण्यात आली. तसेच सुभाष बिरादार यांची जिल्हा कार्यकारिणीवर तर तानाजी सोनटक्के यांची उदगीर वधू- वर मेळावा प्रमुख म्हणून निवड जाहीर करण्यात आली.

या बैठकीस जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत काला पाटील, तालुका संघटक अमरनाथ मुळे, तालुकाध्यक्ष प्रा. राजेश्वरराव पाटील, तालुका सरचिटणीस तानाजी सोनटक्के, परमेश्वर पटवारी, शिवाजी स्वामी, सुभाष शेरे, दीपक तोंडारे, राहुल तोंडारे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Prakash Tondare as the city president of Lingayat Federation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.